bribe crime esakal
नाशिक

Nashik Bribe Crime : Industrial शेड परवानगीसाठी मागितले 30 हजार; एजंटला अटक

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : इंडस्ट्रिअल परवानगीसाठी एनएमआरडीएकडून (नाशिक महानगर प्रदेश विकास प्राधीकरण कार्यालय) लागणारा परवाना काढून देण्यासाठी ३० हजार रुपयांची लाच स्वीकारताना एजंटला अटक करण्यात आली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने मंगळवारी (ता.४) सायंकाळी शरणपूर रोडवरील कुलकर्णी गार्डन येथे सापळा रचून कारवाई केली. सागर प्रकाश मोरे असे लाचखोर एजंटचे नाव आहे.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या माहितीनुसार, तक्रारदारास औद्योगिक क्षेत्रात इंडस्ट्रिअल शेड बांधकामाची परवानगीची आवश्‍यकता होती. यासाठी लाचखोर सागर प्रकाश मोरे (२८, रा. रायगड चौक, सिडको, नाशिक) याने एनएमआरडीएमध्ये आपली ओळख असून, तक्रारदारास परवाना मिळवून देतो यासाठी गेल्या १५ सप्टेंबर रोजी ३० हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली. याबाबत तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली होती.

त्यानुसार संशयितास तक्रारदाराने मंगळवारी (ता.४) सायंकाळी शरणपूर रोडवरील कुलकर्णी गार्डन येथे बोलाविले असता, त्यावेळी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सापळा रचला. तक्रारदाराकडून ३० हजार रुपयांची लाच स्वीकारताना एजंट मोरे यास पथकाने रंगेहाथ अटक केली. या प्रकरणी सरकारवाडा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस अधीक्षक सुनील कडासने, अपर अधीक्षक नारायण न्याहाळदे, उपअधीक्षक सतीश भामरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक मीरा आदमाने, हवालदार पंकज पळशीकर, नितीन कराड, प्रभाकर गवळी, प्रवीण महाजन, संतोष गांगुर्डे यांच्या पथकाने सदरची कामगिरी बजावली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ऑस्ट्रेलियाविरुद्ध मालिकेतून ठरणार रोहित-विराटचं भवितव्य? माजी प्रशिक्षकाच्या विधानानं खळबळ...

Arya Chavan: आर्या चव्हाणच्या मारकऱ्याला फाशीच द्या! 'सातारा सकल मराठा क्रांती मोर्चासह ग्रामस्‍थ आक्रमक'; खटला जलदगती न्‍यायालयात चालवा

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्राच्या बहुतांश भागांतून मॉन्सून माघारी

Quick Breakfast Idea: प्रोटिनने भरपूर, चवीला मस्त! सकाळच्या नाश्त्यासाठी बनवा खुसखुशीत बटर गार्लिक पनीर

मोठी बातमी! दिवाळीपूर्वी नुकसान भरपाईची ग्वाही, पण ३३ पैकी ५ जिल्ह्यांचेच पंचनामा अहवाल अंतिम; शेतकऱ्यांसाठी ३१,६२८ कोटींचे पॅकेज, पण...

SCROLL FOR NEXT