drumstick cultivation scheme esakal
नाशिक

नाशिक : शेवगा लागवड योजनेतंर्गत प्रतिहेक्टरी ३० हजार अनुदान

कुणाल संत

नाशिक : राष्ट्रीय पशुधन अभियान (अनुसूचित जाती उपयोजना) अंतर्गत अनुसूचित जाती प्रवर्गातील शेतकरी पशुपालकांना वैरणीसाठी शेवगा लागवड करण्यासाठी हेक्टरी ३० हजार रुपये अनुदान उपलब्ध करून देण्यात येणार असल्याने शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. बी आर नरवाडे यांनी केले आहे.

वैरण शेवगा लागवड योजनेतंर्गत जिल्ह्यास १५ हेक्टर क्षेत्राकरिता ०४ लाख ५० हजारांचे अनुदान वितरित करण्यात आले आहे. यात प्रतिहेक्‍टरी ७.५ किलो शेवगा बियाण्याची किंमत ६ हजार ७५० व उर्वरित २३ हजार २५० अनुदान लाभार्थ्यांना दोन टप्प्यामध्ये वितरित करण्यात येईल. यात पशुपालकांना बियाण्याचा थेट पुरवठा करण्यात येणार असून, उर्वरित अनुदानातून जमिनीची मशागत व लागवड खतांची खरेदी व इतर आनुषंगिक खर्चासाठी देण्यात येईल. योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकरी पशुपालकांनी जिल्ह्याच्या पशुसंवर्धन उपायुक्त कार्यालय, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी जिल्हा परिषद, पशुधन विकास अधिकारी (विस्तार) पंचायत समिती किंवा नजीकच्या पशुवैद्यकीय दवाखान्यात संपर्क साधावा, असे आवाहन डॉ. नरवाडे यांनी केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai: मुंबईच्या पाणीपुरवठ्यात क्रांती? अनेक भागांना जोडणारे नवे बोगदे प्रस्तावात; यादी आली समोर, जाणून घ्या...

Mahad News : कशेळीचा कनकादित्य! 1300 वर्षा पूर्वीची अखंड सूर्य उपासनेची परंपरा उलगडली

DMart Secrets : डिमार्टमध्ये मुलांपेक्षा जास्त मुलीच कामाला का घेतल्या जातात? खरं कारण जाणून आश्चर्यचकित व्हाल

Latest Marathi news Live Update : न्यूयॉर्क आणि नेवार्कहून येणारी आणि जाणारी सर्व एअर इंडियाची विमाने रद्द

Ladki Bahin Yojana : जळगावात ‘लाडकी बहीण’ योजनेचा बोजवारा; केवायसीच्या घोळामुळे हजारो महिला लाभापासून वंचित

SCROLL FOR NEXT