Booster dose latest marathi news esakal
नाशिक

बूस्टर डोससाठी शहरात 34 केंद्र; सव्वासात लाख नागरिक लक्ष्य

विक्रांत मते

नाशिक : कोरोना रुग्णांची (corona patients) संख्या वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्र व राज्य सरकारने बूस्टर डोस (Booster Dose) मोफत देण्याच्या सूचना दिल्या आहेत.

त्यानुसार नाशिक महापालिका (NMC) हद्दीत शुक्रवार (ता. १५) पासून ३४ लसीकरण केंद्रे सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. या माध्यमातून जवळपास सव्वासात लाख नागरिकांना बूस्टर डोस दिले जाणार आहे. (34 centers in city for booster doses nashik Latest Marathi news)

शहरात कोरोनाची पहिली व दुसरी लाट भयानक ठरली. दोन्ही लाटांपेक्षा तिसरी लाट भयानक ठरेल असे भाकीत वर्तविले गेले होते. परंतु, तिसरी लाट अन्य दोन लाटांच्या तुलनेत सौम्य ठरली. या दरम्यान शहरात मोठ्या प्रमाणात लसीकरण झाले. महापालिका हद्दीमध्ये दोन लाख ७३ हजार ५२४ नागरिकांना कोरोना संसर्ग झाला.

त्यात चार हजार १०६ नागरिकांचा बळी गेला. तिसरा लाटेचा मात्र फारसा प्रभाव दिसून आला नाही. परंतु, आता चौथी लाट येण्याची शक्यता वर दिली जात आहे. जुलै महिन्यात त्याची चिन्हे दिसत असून, मोठ्या शहरांमध्ये कोरोना रुग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे.

तिसरी लाट सौम्य ठरण्यासाठी लसीकरण महत्त्वाचे ठरले होते. त्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारच्या आरोग्य मंत्रालयाने राज्यांना दिलेल्या सूचनेनुसार स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये मोफत बूस्टर डोस देण्याच्या सूचना देण्यात आल्याने महापालिका हद्दीमध्ये नियमित लसीकरण व बूस्टर डोस देण्यासाठी ३४ लसीकरण केंद्रे सुरू करण्यात आली.

सध्या महापालिकेकडे ४० हजार कोव्हिशील्ड व पंचवीस हजार कोव्हॅक्सिन लस शिल्लक आहे. शुक्रवारपासून नियमित लसीकरणासह बूस्टर डोस करण्यात आले. शहरात तेरा लाख दोन हजार २९९ नागरिकांनी पहिला डोस घेतला आहे.

तर दहा लाख ५८ हजार ६५२ नागरिकांनी दुसरा डोस घेतला आहे. आतापर्यंत ७४, ९३८ नागरिकांनी बूस्टर डोस घेतला असून, ही टक्केवारी अवघे सहा आहे. सात लाख २५ हजार नागरिकांनी अद्याप बूस्टर डोस घेतला नसल्याची माहिती वैद्यकीय अधिक्षक डॉ. बापूसाहेब नागरगोजे यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dilip Gavit: सुवर्णपदक विजेत्या खेळाडूला अडीच तास ताटकळत ठेवलं! दिलीप गावित यांचा राज ठाकरेंवर संताप

Karamad-Ladsawangi Accident : करमाड–लाडसावंगी रस्त्यावरील खड्ड्यांचा तिसरा बळी; भरधाव टेम्पोच्या धडकेत ७९ वर्षीय वृद्धेचा मृत्यू, चालक फरार

Marathi News Live Updates: मोहन भागवत यांनी सातत्याने 'जनरेशन झेड'शी संवाद साधला आहे, याचा मला आनंद - राहुल नार्वेकर

Godavari Fisherman Electrocuted: गोदावरीच्या पुरात मासेमारी करताना मच्छीमाराचा विजेच्या धक्क्याने मृत्यू; नदीत उतरलेल्या वीजप्रवाहावरून ग्रामस्थांचा संताप

Rajgad Khopadewadi funeral crisis: राजगड परिसरातील खोपडेवाडीत ताडपत्रीखाली अंत्यसंस्कार; स्मशानभूमीअभावी ग्रामस्थांचा संताप उफाळला

SCROLL FOR NEXT