Meat Sellers (File Photo) esakal
नाशिक

Nashik News: शहरात साडेतीनशे अनधिकृत मांस विक्रेते; महापालिकेचे विक्रेता धोरण गुंडाळले

सकाळ वृत्तसेवा

Nashik News: शहराचा विस्तार वाढत असताना रोजगाराचा भाग म्हणून व नागरिकांची मागणी लक्षात घेता मोठ्या प्रमाणात मांस विक्रीची दुकाने थाटण्यात आली आहे. परंतु मांस विक्रीच्या व्यवसायामुळे शहरात रोगराईचे प्रमाणदेखील वाढतं असल्याच्या पार्श्‍वभूमीवर महापालिकेकडून मांस दुकानांसाठी नियमावली तयार करण्यात आली. परंतु, त्या नियमावलीची अंमलबजावणी न झाल्याने प्रशासनासह दुकानदारांनी धोरण गुंडाळल्याचे स्पष्ट झाले आहे.

महापालिकेच्या पशुसंवर्धन विभागाकडून केलेल्या सर्वेक्षणात ३५० हून अधिक विनापरवाना अर्थात अनधिकृतपणे मांस विक्रीची दुकाने असल्याचे स्पष्ट झाले आहे. (350 unauthorized meat sellers in city nashik news)

वाढता व्यवसाया बरोबरच रोगराई वाढतं असल्याने पशुसंवर्धन विभागाने नोटिसा पाठविण्यास सुरवात केली आहे. शहरात सध्या २५० अधिकृत मांस विक्रेत्यांनी परवाना घेतला आहे. याचाच अर्थ ते व्यावसायिक अधिकृत आहे. परंतु पशुसंवर्धन विभागाच्या सर्वेक्षणामध्ये साडेतीनशेहून अधिक मांस विक्रेत्यांनी परवाना न घेताच व्यवसाय सुरू केला आहे. शॉप ॲक्ट लायसन्सच्या आधारे व्यवसाय सुरू आहे. परंतु मांस विक्री करण्यासाठी शासनाने काही नियम आखून दिले आहे.

त्या व्यतिरिक्त महापालिकेने मांस विक्रेत्यांसाठी उपविधी तयार केला आहे. या उपविधीनुसार शहरात मांस, मासळी विक्री करण्यासाठी महापालिकेच्या पशुसंवर्धन विभागाकडे शुल्क भरून अधिकृत परवाना घेणे बंधनकारक करण्यात आले आहे. मांस विक्री करताना जागा स्वच्छ, बंदीस्त असणे आवश्यक आहे. परंतु शहरात अनेक ठिकाणी मांस विक्रीची दुकाने उघड्यावर आहेत. यामुळे अस्वच्छता होऊन रोगराईला सामोरे जावे लागते.

प्राप्त तक्रारीनुसार पशुसंवर्धन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी मांस विक्रेत्यांच्या दुकानांनाही प्रत्यक्ष भेटी दिल्या. त्यात ३५० मांस विक्रेत्यांनी महापालिकेकडे परवान्यासाठी अर्ज केल्याचे दिसून आले. त्यापैकी सुमारे २५० विक्रेत्यांना तरतुदींनुसार परवाना देण्यात आला.

अद्यापही शहरात साडेतीनशेहून अधिक मांस विक्रेते विनापरवाना व्यवसाय करीत असल्याची बाब पशुसंवर्धन विभागाच्या निदर्शनास आली आहे. मांस विक्रीसाठी महापालिकेच्या पशुसंवर्धन विभागाकडून १ वर्षाचा परवाना दिला जातो. दरवर्षी जानेवारीत या परवान्याचे नूतनीकरण करणे बंधनकारक आहे, अशी माहिती पशुसंवर्धन अधिकारी डॉ. प्रमोद सोनवणे यांनी दिली.

विभागनिहाय अधिकृत मांस विक्रेते

- पूर्व - १७८

- सिडको - १५०

- पंचवटी - १४५

- नाशिक रोड - १४३

- सातपूर - ९८

- पश्चिम -१३

"मांस विक्री करण्यासाठी परवाना बंधनकारक आहे. परवाना न घेतल्यास ते दुकान अनधिकृत म्हणून गणले जाते व संबंधिताला पाचशे रुपयांप्रमाणे दंडाची आकारणी केली जाते." - डॉ. प्रमोद सोनवणे, पशुसंवर्धन अधिकारी, महापालिका

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

China criticizes US: भारताची बाजू घेत चीनने पुन्हा एकदा अमेरिकेवर केली उघडपणे टीका, म्हटले...

Rohit Sharma कर्णधार म्हणून कसा आहे? राहुल द्रविडने स्पष्टच सांगितले; म्हणाला, 'मला नेहमीच जाणवलं तो...'

Donald Trump: अलास्कातून परतताना पुतिन यांनी इंधनासाठी २.२ कोटी रुपये रोखीने दिले; नेमकं काय घडलं?

Solapur News : मालमत्ता करदात्यांना सुवर्णसंधी! ३० सप्टेंबरपर्यंत व्याज-दंडात १००% सूट

Maharashtra Latest News Update: देश-विदेशासह राज्यात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

SCROLL FOR NEXT