Money Crime esakal
नाशिक

Nashik Crime: खंडणी, अपहरण प्रकरणी चौघे ताब्यात

सकाळ वृत्तसेवा

Nashik Crime : वाहनाचा अपघात झाल्याचे कारण दाखवत एकाला बेदम मारहाण आणि लूटमार केल्याप्रकरणी इंदिरानगर पोलिसांनी अवघ्या चार तासांत चौघांना ताब्यात घेतली.

रात्री उशिरापर्यंत खंडणी आणि अपहरणाचा गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. (4 detained in extortion kidnapping case Nashik Crime)

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रफुल्ल वसंतराव कोटगिरे (४४, रा. हार्दिक अपार्टमेंट लोखंडे मळा, जेल रोड) हे बुधवारी (ता. २७) रात्री आठच्या सुमारास त्यांच्या कारमधून (एमएच- १५- डीसी- ९४८२) पाथर्डी फाट्यापासून पाथर्डी गावाकडे जात होते.

या वेळी वाहनासोबत अपघात झाल्याच्या कारणावरून शेल पेट्रोलपंपाजवळ चार संशयितांनी त्यांची कार अडवली. आतमध्ये बळजबरीने बसत गौळाणे रोडवरील हॉटेल एसएसके क्लब पुढे नेले. चौघांनीही त्यांना मारहाण करण्यास सुरवात केली.

तसेच खिशातील पाकीट आणि कागदपत्रे काढून घेतले. ५० हजार रुपये दे नाहीतर अजून मारहाण करील, अशी धमकी दिली. फोन पेद्वारे संशयितांनी २१ हजार रुपये काढून घेतले. सदर प्रकार घडल्यानंतर कोटगिरे यांनी इंदिरानगर पोलिस ठाणे गाठत सदर प्रकार सांगितला.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

इंदिरानगरच्या गुन्हे शोध पथकाने चार तासातच तपास चक्रे फिरवत चारही संशयिताना ताब्यात घेतले. याप्रकरणी चौघांविरुद्ध इंदिरानगर पोलिस ठाण्यात खंडणी तसेच अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदर कामगिरी वरिष्ठ पोलिस निरीक्षक नितीन पगार यांच्या मार्गदर्शनाखाली युवराज पाटील, जावेद खान, सागर परदेशी, विशाल पाठक, मुश्रीफ शेख, श्यामल जोशी, योगेश जाधव यांनी केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Solapur Accident: स्वामी दर्शनासाठी निघालं कुटुंब, पण वाटेतच कोसळला दुःखाचा डोंगर; ५ महिन्यांच्या चिमुकलीचा मृत्यू, ५ जण जखमी!

Land Dispute: शेतकऱ्यांसाठी खुशखबर! जमिनीचे वाद सोडवणे झाले सोपे; महाराष्ट्र जमीन महसूल संहितेत बदल

Maratha Reservation News: 'जरांगे तुझ्यात दमच नाही' बारस्करांनी दिलं चॅलेंज, नेमकं काय म्हणाले?

PBKS vs RCB: वेंकटेश अय्यरची तुफानी फटकेबाजी, विराट कोहलीचंही विक्रमी अर्धशतक; बंगळुरूने पंजाबसमोर ठेवलं भलं मोठं लक्ष्य

Bhumii Utsav 2026 : बारामतीत ‘भूमी उत्सव 2026’ उन्हाळी प्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद; 200 हून अधिक लघुउद्योजकांचा सहभाग

SCROLL FOR NEXT