4 Masicon conference in Nashik on thursday nashik news esakal
नाशिक

Nashik News : नाशिकमध्ये चौथ्यांदा ‘मॅसिकॉन’ परिषद; गुरुवारी उद्‌घाटन

‘मॅसिकॉन २०२४’ ही राज्यस्तरीय परिषद त्र्यंबक रोडवरील ‘दि डेमोक्रेसी हॉटेल्स ॲन्ड रिसॉर्टस् ॲन्ड कव्हेंशन सेंटर’ येथे गुरुवार (ता. ८)पासून रविवार (ता. ११)पर्यंत होत आहे.

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : द असोसिएशन ऑफ सर्जन्स ऑफ इंडिया आणि नाशिक सर्जिकल सोसायटीतर्फे ‘मॅसिकॉन २०२४’ ही राज्यस्तरीय परिषद त्र्यंबक रोडवरील ‘दि डेमोक्रेसी हॉटेल्स ॲन्ड रिसॉर्टस् ॲन्ड कव्हेंशन सेंटर’ येथे गुरुवार (ता. ८)पासून रविवार (ता. ११)पर्यंत होत आहे.

परिषदेत देशभरातील तज्‍ज्ञ शल्‍यचिकित्‍सक नवीन तंत्रज्ञानासंदर्भात मार्गदर्शन करणार असल्‍याची माहिती आयोजन समितीचे सचिव डॉ. महेश मालू यांनी पत्रकार परिषदेत दिली. (4 Masicon conference in Nashik on thursday nashik news)

पत्रकार परिषदेस समितीचे मार्गदर्शक डॉ. प्रमोद शिंदे, अध्यक्ष डॉ. गोविंद कुलकर्णी, सहअध्यक्ष डॉ. सुधीर भामरे, खजिनदार डॉ. नंदकिशोर कातोरे, सायंटिफिक कमिटीचे अध्यक्ष डॉ. अद्वय आहेर, डॉ. हर्षद महात्‍मे आदी उपस्‍थित होते. डॉ. मालू म्‍हणाले, की परिषदेचे औपचारिक उद्‌घाटन शनिवारी (ता. १०) ‘एएसआय’चे अध्यक्ष डॉ. प्रोबल नियोगी (प्रयागराज), सचिव डॉ. प्रताप वरुटे यांच्या हस्ते होईल. राज्‍याचे अध्यक्ष डॉ. संजय कोलते यांचीही उपस्‍थिती असेल.

राज्‍यभरातून सुमारे एक हजार ५०० शल्‍यचिकित्‍सक सहभागी होतील. ‘एएसआय’च्या महाराष्ट्र शाखेची ४६ वी वार्षिक परिषद असेल. अध्यक्ष डॉ. कुलकर्णी म्हणाले, की परिषदेनिमित्त वेगवेगळ्या समित्यांची स्थापना केली आहे. सांस्कृतिक कार्यक्रमांचेही आयोजन केले, तसेच स्मरणिका व माहितीपत्र प्रकाशित केले जाईल. डॉ. शिंदे म्हणाले, की भारतभरातून तज्‍ज्ञ डॉक्टर नाशिकमध्ये येणार असून, त्यांचे नवनवीन तंत्रज्ञानाविषयी मार्गदर्शन होणार आहे.

ॲडवान्स्‍ड एंडोस्‍कोपीचा प्रथमच समावेश

राज्‍यस्‍तरीय परिषदेत ‘ॲडवान्स्‍ड एंडोस्‍कोपी’ या तंत्रज्ञानावर आधारित शस्‍त्रक्रियेचे प्रात्यक्षिक दाखविले जाणार असून, परिषदेत प्रथमच या तंत्रज्ञानावर आधारित शस्‍त्रक्रिया केली जाणार आहे. याशिवाय, रोबोटिक शस्‍त्रक्रिया व इतर आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित एकूण ३५ शस्‍त्रक्रियांचे प्रक्षेपण केले जाईल, अशी माहिती डॉ. आहेर यांनी दिली.

नाशिकमध्ये चौथ्यांदा आयोजन

नाशिकमध्ये यापूर्वी मॅसिकॉन ही राज्‍यस्‍तरीय परिषद १९९४ मध्ये झाली होती. या परिषदेसाठी डॉ. सुभाष सुराणा यांनी आयोजन समिती सचिव म्‍हणून काम पाहिले होते. २००२ मध्ये डॉ. वसंतराव पवार हे आयोजन समिती सचिव होते. सचिव डॉ. प्रमोद शिंदे असताना २०१३ मध्ये ही परिषद झाली होती. तेव्‍हा ३२ शस्‍त्रक्रियांचे प्रक्षेपण केले होते. आता चौथ्यांदा नाशिकमध्ये ही परिषद होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

दहावीच्या विद्यार्थ्याचा शिक्षकांकडून छळ… दिल्ली मेट्रो प्लॅटफॉर्मवरून उडी मारत जीवन संपवलं! शेवटचं वाक्य अंगावर काटा आणणारं

Latest Marathi News Update LIVE: पुण्यात सलग तीन दिवस १० अंशांखाली तापमान

Bihar Probable Ministers List : नितीशकुमार यांच्या नवीन मंत्रिमंडळातील संभाव्य मंत्र्यांची यादी आली समोर!

Amravati Crime: अमरावती हादरली! युवकाची पूर्ववैमनस्यातून हत्या

Bicycle Riding: 'सोलापूरच्या चौघांनी के२के सायकल रायडिंगमध्ये रचला इतिहास'; काश्मीर ते कन्याकुमारी १६ दिवसांमध्ये ४२०० किमी प्रवास पूर्ण..

SCROLL FOR NEXT