Power Theft esakal
नाशिक

अबब! 40 लाखांची वीजचोरी; 2 व्यावसायिकांवर गुन्हा दाखल

विनोद बेदरकर

नाशिक : घोटी (ता. इगतपुरी) येथील साईमेवा फूडस ॲन्ड बेवरजेस या बाटलीबंद पिण्याचे पाणी कारखान्यावर महावितरणच्या नाशिक येथील भरारी पथकाने छापा टाकला. या वेळी वीज मीटरमध्ये छेडछाड करून एकूण दोन लाख २१ हजार ८५६ वीज युनिटस, म्हणजेच एकूण ४० लाख ३७ हजार ४७० रुपयांची वीजचोरी केल्याचे उघडकीस आले.

मीटर रीडिंगची स्क्रीनच बंद

याप्रकरणी महावितरणने दिलेल्या फिर्यादीवरून घोटी पोलिस ठाण्यात कारखान्याचे मालक डॉ. प्रदीप जयस्वाल व मेघराज भगत यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. संबंधित कारखान्याच्या नावाने थ्री फेज वीज जोडणी दिलेली आहे. डॉ. प्रदीप जयस्वाल यांच्या मालकीच्या या कारखान्याचे कामकाज सध्या मेघराज भगत हे बघतात. महावितरण कंपनीचे सहाय्यक अभियंता ए. जी. चव्हाण तपासणीसाठी गेले असता त्यांनी उपस्थित कर्मचाऱ्यांना कारखान्याचे वीजमीटर दाखविण्याची विनंती केली. मात्र, त्यांनी वीजमीटरबाबत निश्‍चित माहिती नाही मालकांना विचारून सांगतो, असे सांगितले. त्यामुळे संशय आल्याने सहाय्यक अभियंता चव्हाण आणि इतर कर्मचाऱ्यांनी कारखान्यातील वायरींगच्या आधारे वीजमीटर शोधून काढले. त्या वेळी विविध प्रकारची यंत्रे व विद्युत दिवे आदी विजेच्या उपकरणांचा जोडभार १४२.३८ किलोवॅट इतका आढळला.

त्यावर, विजेची उपकरणे कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत सुरू करून तपासणी केली असता, वीजमीटर रीडिंग दर्शविणारी मीटरची स्क्रीन बंद होती. तसेच मीटरचे टर्मिनलचे कव्हर काढून बाजूला ठेवलेले होते. टर्मिनलमधील आरवायबी (RYB) या तीनही फेजच्या होल्टेजचे स्क्रू सैल केलेले होते. त्यामुळे वीजमीटर बंद होते व वापरलेल्या विजेची नोंद मीटरमध्ये होत नाही असे लक्षात आले. त्यामुळे पथकाचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता विद्युतकुमार पवार यांच्या फिर्यादीवरून घोटी तालुका पोलिस ठाण्यात डॉ. प्रदीप जयस्वाल व मेघराज भगत यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. श्री. पवार व श्री. चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली कनिष्ठ अभियंता डी. जी. पंडोरे, वरिष्ठ तंत्रज्ञ एस. एस. जाधव व यु. इ. बागडे यांच्या पथकाने ही कारवाई केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT