11th online.jpg 
नाशिक

अकरावी प्रवेशासाठी पहिल्याच दिवशी चार हजार ६३८ विद्यार्थ्यांची नोंदणी

अरुण मलाणी

नाशिक : नाशिक महापालिका क्षेत्रातील कनिष्ठ महाविद्यालयात ऑनलाइन केंद्रिभूत स्वरूपात प्रवेशप्रक्रिया राबविली जाते आहे. याअंतर्गत अर्ज करण्याच्‍या पहिल्‍याच दिवशी शनिवारी (ता.१४) विद्यार्थ्यांचा जोरदार प्रतिसाद मिळाला. सायंकाळी सातपर्यंत चार हजार ६३८ अर्ज दाखल झाले होते. अकरावी प्रवेशासाठी सर्व शाखा मिळून २४ हजार ७५० जागा उपलब्‍ध आहेत.


प्रवेशातील घोडेबाजारी थांबविण्यासाठी शालेय शिक्षण विभागातर्फे राज्‍यातील प्रमुख महापालिका हद्दींमध्ये केंद्रिभूत ऑनलाइन प्रवेशप्रक्रिया राबविली जाते. यात नाशिक महापालिकेचाही समावेश आहे. अकरावी प्रवेशाकरिता अर्जाचा भाग एक भरण्याची प्रक्रिया शनिवारी (ता.१४) सुरू झाली. पहिल्‍याच दिवशी विद्यार्थ्यांचा उत्‍स्‍फूर्त प्रतिसाद मिळाला. सायंकाळी सातपर्यंत चार हजार ६३८ विद्यार्थ्यांची संकेतस्‍थळावर नोंदणी झाली होती. दोन हजार २६६ अर्ज लॉक केलेले आहेत. एक हजार १०४ विद्यार्थ्यांच्‍या अर्जाची पडताळणी प्रक्रिया पूर्ण झाली आहे.

मंगळवारपासून भाग दोन

नाशिक महापालिका क्षेत्रातील ५८ कनिष्ठ महाविद्यालयांत विविध शाखांच्‍या २४ हजार ७५० जागा उपलब्‍ध आहेत. अर्ज दाखल करण्यासाठी २२ ऑगस्‍टपर्यंत मुदत आहे. मंगळवार (ता.१७)पासून अर्जाचा भाग दोन भरता येणार आहे. याअंतर्गत विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी शाखा, कनिष्ठ महाविद्यालयांचा प्राधान्‍यक्रम नोंदविता येईल.


असे असेल वेळापत्रक

२३ ऑगस्‍टला तात्पुरती गुणवत्तायादी जाहीर केली जाईल. यादीसंदर्भातील हरकती, तक्रार नोंदविण्याकरिता २४ ऑगस्‍टच्‍या सायंकाळी पाचपर्यंत वेळ उपलब्‍ध असेल. २५ ऑगस्‍टला सामान्‍य गुणवत्ता यादी जाहीर होईल. २५ व २६ ऑगस्‍ट असे दोन दिवस माहिती प्रक्रियेसाठी राखीव ठेवले आहेत. २७ ऑगस्‍टला पहिल्‍या फेरीतील गुणवत्ता यादी प्रसिद्ध केली जाईल. या यादीतील विद्यार्थ्यांना ३० ऑगस्‍टपर्यंत प्रवेशाची मुदत असेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs SL, 2nd Test, 4th Day: श्रीलंकेला आघाडी घेण्यात यश, पण भारताची सामन्यावर मजबूत पकड; सूरियाबंदाराचं शतक हुकलं

B.Arch Admission Round 3 : बी. आर्किटेक्चर प्रवेश प्रक्रियेची तिसरी यादी जाहीर; ७५८ विद्यार्थ्यांना नवी संधी, ५३६ जणांचे ऑटो फ्रिज प्रवेश निश्चित

विदर्भासह मध्य भारतात पावसाचा अलर्ट; अतिमुसळधार पावसाचा इशारा

Sakal Impact | MPSC Drug Inspector Exam Scam: एमपीएससी औषध निरीक्षक भरतीत पेपरफुटीला दुजोरा; संपूर्ण प्रक्रिया रद्द, शुल्काविना फेरपरीक्षा जाहीर

Nepal Flood: नेपाळमध्ये पावसाविना पूर! २९१ विदेशी नागरिक बेपत्ता; १०५ भारतीयांचा समावेश, १६ जणांचा मृत्यू

SCROLL FOR NEXT