Obesity Problem esakal
नाशिक

Obesity Problem : नाशिकमधील 25 वर्षाआतील 47 टक्‍के महिलांना स्थूलतेचा धोका!

सकाळ वृत्तसेवा

Obesity Problem : जागतिक आरोग्यदिनानिमित्त नाशिकमध्ये १ हजार ८०० व्यक्तींचे सर्वेक्षण करण्यात आले. त्यामध्ये २५ वर्षांखालील ४७ टक्के महिला आणि ३६ टक्के पुरुषांमध्ये स्थूलतेचा धोका आढळून आला.

अनारोग्यकारक खाण्याच्या सवयी, बैठेकाम करण्याची जीवनशैली, वाढता तणाव, मद्यपान आणि तंबाखूचे सेवन या कारणांमुळे लठ्ठपणाचा धोका आहे. (47 percent of women under 25 years of age in Nashik at risk of obesity nashik news)

हेही वाचा : सामान्यांचा पैसा सुरक्षित ठेवण्यासाठीच Virtual Currency करकक्षेत

जून २०२० ते डिसेंबर २०२२ पर्यंत प्रतिबंधात्मक आरोग्य तपासणी करण्यात आली. इंडस हेल्थ ॲब्नॉर्मलिटी अहवालातून १५ टक्के महिला आणि २३ टक्के पुरुषांना मधुमेह होण्याचा धोका पुढे आला आहे. प्रतिबंधात्‍मक आरोग्‍यसेवा विशेषज्ञ अमोल नायकवडी म्‍हणाले, की तरुणांमध्ये लठ्ठपणाचे अधिक प्रमाण दिसून येत आहे.

नाशिकमधील महिलांमध्‍ये मधुमेहाचे प्रमाण अधिक आहे. मधुमेह होण्‍याचा धोका कमी करण्यासाठी वेळेवर तपासणी करण्‍याचा सल्‍ला दिला जातो. शारीरिक व्‍यायाम आणि आरोग्‍यदायी आहारामुळे लठ्ठपणाचा धोका कमी होऊ शकतो.

तसेच कोरोनानंतर लोक त्‍यांच्‍या आरोग्‍याबाबत अधिक जागरूक बनले आहेत आणि तरुण पिढी व कुटुंबातील सदस्‍यांसह नियमितपणे आरोग्‍य तपासणी करण्‍यास येत आहेत, असे निदर्शनास आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Army Harassment: वरिष्ठांचा त्रास, जवानाने जीव संपवला ; लष्करी वसाहतीतील घटना, दोघांवर गुन्हा दाखल

OBC Development : ओबीसींच्या विकासासाठी एक रुपयांत जागा;उपसमितीच्या बैठकीत चंद्रशेखर बावनकुळेंचे निर्देश

Asian Games: तिरंदाजीत भारताची 'गोल्डन हॅट्रिक'! महिलांपाठोपाठ पुरुष संघाचेही वर्चस्व; तर नेमबाज नीरु धंडा-कायनान चेनाईचा सुवर्णवेध

Ratnagiri Tourism : ‘थ्रीडी शो’ अन् ‘शिवसृष्टी’ तोट्यात, उत्पन्न ८ लाख तर खर्च ९ लाख; नावीन्यपूर्ण उपक्रम ठरताहेत ‘पांढरा हत्ती’

Corruption Case : पूजा खेडकरच्या वडिलांच्या घरावर छापा, कोट्यवधींची बेहिशोबी मालमता; उत्पन्नाच्या १०३ टक्के जास्त माया जमवली कशी?

SCROLL FOR NEXT