Upper Superintendent of Police Aniket Bharti, Inspector of Police Raghunath Shegar along with a team of Cantonment Police who busted a mobile phone stealing gang in the city, seized mobiles. esakal
नाशिक

Nashik Crime News : मोबाईल चोरट्यांची टोळी गजाआड; 5 जणांना अटक

शहरात भरधाव दुचाकीवर येऊन मोबाईल चोरी करणाऱ्या तरुणांच्या टोळीला छावणी पोलिसांनी शिताफीने अटक केली आहे.

सकाळ वृत्तसेवा

Nashik Crime News : शहरात भरधाव दुचाकीवर येऊन मोबाईल चोरी करणाऱ्या तरुणांच्या टोळीला छावणी पोलिसांनी शिताफीने अटक केली आहे.

मोबाईल चोरीच्या गुन्ह्यात अटक केलेल्या संशयिताला विश्‍वासात घेऊन चौकशी केल्यानंतर या टोळीचा छडा लागला. (5 accused arrested by police who stolen mobile nashik crime news)

पोलिसांनी पाच संशयितांना अटक केली असून याशिवाय अन्य एका विधीसंघर्षित बालकाचाही समावेश होता. पोलिसांनी त्यांच्या ताब्यातून १६ मोबाईल व गुन्ह्यात वापरलेल्या तीन दुचाकी जप्त केल्या आहेत. छावणी व कॅम्प पोलिस ठाण्याच्या हद्दीत गेल्या आठवड्यात मुजाहिद अहमद, आशुतोष ढिवरे, गजेंद्र सिंह राजपुरोहित आदींचे मोबाईल चोरी गेले होते.

याशिवाय अन्य दोन प्रकार घडले होते. नागरिक रस्त्याने जाताना मोबाईलवर बोलत असताना भरधाव दुचाकीवर येत त्यांचे मोबाईल हिसकावण्याचे प्रकार वाढत होते. जिल्हा पोलिस अधीक्षक शहाजी उमाप यांनी त्याची गंभीर दखल घेतली. अप्पर पोलिस अधीक्षक अनिकेत भारती, सहाय्यक अधीक्षक सचिन गुंजाळ यांना संशयितांचा शोध घेण्याचा आदेश दिला.

श्री. भारती, श्री. गुंजाळ यांच्या मार्गदर्शनाखाली छावणीचे पोलिस निरीक्षक रघुनाथ शेगर, उपनिरीक्षक भगवान कोळी, सचिन चौधरी, हवालदार शरद भुसनर, भरत गांगुर्डे, पोलिस नाईक प्रसाद देसले, कैलास चोथमल, शांतिलाल जगताप, विलास बागडे, किरण पाटील, संदीप राठोड, राम निसाळ आदींनी कारवाई करून या चोरट्यांच्या टोळीला अटक केली.

अटक केलेल्यांमध्ये यशोदीप विजय खरे (१९), तुषार आप्पा आहिरे (१९, दोघे रा. पंचशीलनगर, मालेगाव), राहुल संजय खैरनार (२१, रा. काष्टी), समाधान श्रावण खैरनार (१९), सुनील नंदू पगारे (२४, दोघे रा. अजंग) यांचा समावेश आहे.

त्याशिवाय अन्य एका अल्पवयीन मुलाचाही या टोळीत सहभाग होता. संशयितांच्या ताब्यातून सोळा मोबाईल व तीन दुचाकी जप्त करण्यात आल्या. त्यांच्याविरुद्ध छावणी व कॅम्प पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shubhanshu Shukla Research : शुभांशु शुक्लांनी अंतराळात केला थरारक प्रयोग! बनले 'या' खास गोष्टीवर संशोधन करणारे पहिले भारतीय..

Nagpur Fraud: खोट्या रजिस्ट्रीच्या आधारे उचलले ३८ लाखांचे गृहकर्ज

Pune News : रस्त्याच्या मधोमध झाडामुळे अपघाताचा धोका; प्रयेजा सिटी सोसायटी परिसरातील स्थिती, जवळच शाळा असल्याने चिंता

Latest Maharashtra News Live Updates: अर्जेंटिनाचा यशस्वी दौऱ्यानंतर , पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं ब्राझीलची राजधानी रिओ दि जनेरियो इथं भव्य स्वागत

Pune News : नानासाहेब पेशवेंच्या समाधीची दुरवस्था; परिसरात कचऱ्याची समस्या; महापालिकेच्या दुर्लक्षामुळे ऐतिहासिक वारसा उपेक्षित

SCROLL FOR NEXT