Nashik news esakal
नाशिक

नाशिक : पंचवटीत 5 दुचाकी जळून खाक

सुदैवाने आगीत कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही.

सकाळ वृत्तसेवा

म्हसरूळ (नाशिक) : पंचवटीतील गुरुद्वारासमोर असलेल्या एका अपार्टमेंटच्या पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या दुचाकींना आग लागून पाच दुचाकी जळून खाक झाल्याची घटना बुधवारी (ता. २२) रात्री साडेअकरा वाजता घडली. सुदैवाने आगीत कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही.

बुधवारी रात्री गुरुद्वारासमोर असलेल्या सीमा अपार्टमेंटमधील रहिवाशांनी पार्किंगमध्ये नेहमीप्रमाणे दुचाकी उभ्या केलेल्या होत्या. रात्री साडेअकरा वाजता आवारात काहीतरी जळाल्याचा वास येऊ लागल्याने आणि धूर झाल्याने सदस्यांनी तत्काळ टेरेसवर धाव घेतली असता, दुचाकी पेटलेल्या दिसल्या. नागरिकांनी तत्काळ पाणी मारून आग विझविण्याचा प्रयत्न केला. इमारतीच्या वाहनतळात मोठा भडका उडाल्याने त्यांनी सुरवातीला सदनिकेच्या राहणाऱ्या नागरिकांना बाहेर काढले. आग लागल्याचे दिसताच शेजारी रहिवाशांनी आग विझविण्याचा प्रयत्न केला.

सदर माहिती पंचवटी अग्निशमन दलास मिळताच त्यांनी तत्काळ धाव घेत आग आटोक्यात आणली. या घटनेत संतोष घुमरे, जोगासिंग थियारा, सिंधू धुमाळ, शशिकांत जगताप, कुणाल खैरनार यांच्या पाचही दुचाकी पूर्णपणे जळून खाक झाल्याने दुचाकी धारकांचे मोठे नुकसान झाले आहे. घटनास्थळी पोलिस दाखल झाले होते. त्यांनी याबाबत नोंद केली आहे. तसेच, ही आग शॉर्टसर्किटमुळे लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vietnam Boat Accident: व्हिएतनाम बोट दुर्घटनेत 15 भारतीयांचा मृत्यू; बोटीत असलेल्या 32 भारतीयांची नावं आली समोर

Pune News: कर्तव्य बजावणाऱ्या PSI ला दिलासा; पुण्यातील डेक्कन हॉटेल कारवाईप्रकरणी संदीप कदम यांचे निलंबन मागे

Karad Crime: कऱ्हाड शहर पोलिसांची दमदार कामगिरी! पिस्टल विक्रीस आलेल्या चौघांना अटक; चार देशी बनावटीचे पिस्टल, आठ जिवंत काडतुसे जप्त

MPSC Protest: विद्यार्थ्यांसोबत आजीही मैदानात! एमपीएससी आणि पोलिस भरतीसाठी संगमनेरमध्ये अनोखे आंदोलन, प्रांत कार्यालयासमोर ठिय्या

Ration Distribution: रेशनधारकांसाठी आनंदाची बातमी! ऑगस्ट ते ऑक्टोबरचे तीन महिन्यांचे धान्य एकाचवेळी मिळणार; वितरणात मोठा बदल

SCROLL FOR NEXT