NDCC Bank
NDCC Bank esakal
नाशिक

नामपूर शिक्षक पतसंस्थेचे अडकले 5 कोटी

प्रशांत बैरागी

नामपूर (जि. नाशिक) : नामपूर विभागातील सहकारी पतसंस्थांची (Co-operative Credit Societies) मुदत ठेव, रिझर्व्ह फंड, चालू व सेव्हिंग (Current & Saving) खात्यातील कोट्यवधी रूपयांची हक्काची रक्कम जिल्हा बॅंकेकडे (District bank) थकल्याने ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा असलेल्या सहकारी पतसंस्था अडचणीत आल्या आहेत. येथील प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेची (Primary Teachers Co-operative Credit Societies) सुमारे दोन कोटी रुपयांची रक्कम गेल्या साडेपाच वर्षांपासून अडकून पडल्याने सभासदांना कर्जवाटप करताना संचालक मंडळाला तारेवरची कसरत करावी लागत आहे. वेळेवर शिक्षकांना कर्ज मिळत नसल्याने जिल्हा मध्यवर्ती बँकेने (District Central Bank) शिक्षक पतसंस्थेचा गळा घोटल्याची भावना सर्वसामान्य सभासदांमध्ये आहे. (5 crore of Nampur Shikshak Patsanstha stuck Nashik News)

नामपूर विभागात मोसम खोऱ्यातील ५५ गावांचा समावेश आहे. नामपूर, आसखेडा, जायखेडा, निताणे, ताहाराबाद, मुल्हेर आदी ठिकाणी जिल्हा बँकेच्या शाखांचा समावेश आहे. नामपूर शहरात सुमारे १६ सहकारी तत्वावर चालणाऱ्या पतसंस्था आहेत. या सर्व पतसंस्थांचे आर्थिक व्यवहार जिल्हा बँकेत होत असत. दररोज लाखो रूपयांचा भरणा येथील शाखेत केला जात होता. परंतु, गेल्या साडेपाच वर्षात नोटाबंदीमुळे उद्‌भवलेली आर्थिक आणीबाणी, बँकेने गमावलेला विश्‍वास, केवळ दोन- पाच हजार रुपये मिळविण्यासाठी होणारी कसरत आदी बाबींमुळे सहकारी पतसंस्थांच्या प्रशासनाला अनेक अडचणींचा सामना करावा लागला.

नामपूर परिसरातील सहकारी पतसंस्थांचे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडे सुमारे पाच कोटी अडकले आहेत. बँकेने गेल्या पाच वर्षांच्या कार्यकाळात वसुली पथकांच्या माध्यमातून वाहनजप्ती, मुद्दल, व्याजवसुली, ट्रॅक्टर्स लिलाव आदी कठोर निर्णयांमुळे मार्चअखेर वसुलीचा आलेख उंचावला होता. आगामी काळात जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या मोठ्या थकबाकीदारांवर सहकार कायद्यान्वये कठोर कारवाई करून सदर थकबाकीदारांच्या सातबारा उताऱ्यावर बँकेचे नाव लावण्याची कार्यवाही सुरु करण्याचा निर्णय संचालक मंडळाने घेतला होता. त्यानंतरच्या काळात प्रशासकांच्या हाती सत्तासूत्र सोपविण्यात आली. परंतु, अद्यापही सर्वसामान्य ठेवीदार, सहकारी पतसंस्थेला आपल्या हक्काची रक्कम मिळालेली नाही.

"नामपूर येथील शिक्षक सहकारी पतसंस्थेचे जिल्हा बँकेत बँकेत करंट, सेव्हिंग खाते असून, बँकेकडे १ कोटी ५५ लाख रुपयांची ठेव आहे. तसेच, रिझर्व्ह फंडामध्ये ४३ लाख ५० हजार रुपये जमा आहेत. पतसंस्थेच्या सभासदांना मुलांच्या शैक्षणिक कामासाठी, लग्नकार्यासाठी, आर्थिक गरजा पूर्ण करण्यासाठी संस्थेला पैशांची नितांत गरज आहे. बँकेने तातडीने पैसे न दिल्यास विद्यमान संचालक मंडळ बँकेसमोर उपोषणास बसणार आहे."

- युवराज पवार, आर. के. स्मृती प्रगती पॅनलचे नेते

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 MI vs SRH: सूर्यकुमारचं तडाखेबंद शतक अन् मुंबईचा दणदणीत विजय; वानखेडेवर हैदराबादला दिला पराभवाचा धक्का

MI vs SRH: पहिलाच सामना अन् हेडचा उडवलेला त्रिफळा, पण झाला नो-बॉल; निराश झालेल्या अंशुलला बुमराह-हार्दिकने असा दिला धीर

Mumbai News : मुंबईतील कार्यालयीन वेळेत बदल होणार? रेल्वेच्या आवाहनाला ३३ कंपन्यांचा प्रतिसाद

Abhishek Ghosalkar: घोसाळकर कुटुंबियांना सीसीटीव्ही फुटेज दाखवा; हायकोर्टाचे पोलिसांना निर्देश

Mumbai Riots: मुंबईतील 1992च्या दंगलीतील खटले निकाली काढा; सुप्रीम कोर्टाचे सरकारला निर्देश

SCROLL FOR NEXT