Accident News esakal
नाशिक

Nashik Accident News : नाशिकच्या दिंडोरी रोडवर बाईक-बोलेरोचा भीषण अपघात! 6 जण ठार, 2 गंभीर जखमी

Nashik Accident Latest News : बोलेरो गाडीत भाविक वणी कडून नाशिक कडे येत होते, तर दुचाकी ही नाशिक कडून दिंडोरी रोडवरील पिंपळनारे गावाकडे चालली होती.

रोहित कणसे

वणी : नाशिक - वणी या रस्त्यावरील आरोग्य विज्ञान विद्यापीठाजवळील (चिंचबारी) सचिन पेट्रोलपंपाजवळ बोलेरो वाहनावरील चालकाचा ताबा सुटून समोर असलेल्या मोटारसायकलवर धडक देवून झालेल्या भीषण अपघातात ६ जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर २ जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना तत्काळ जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. बोलेराेतील प्रवाशी हे सप्तशृंगी मातेचे दर्शन घेवून नाशिक येथे परतत असतांना घटना घडली आहे.

नाशिक - दिंडोरी रस्त्यावरील आरोग्य विज्ञानविद्यापीठाजवळील सचिन पेट्रोलपंपासमोर बोलेरा वाहन क्रमांक (एमएच 15 जीआर 4105) ही बोलेरा वाहन भरधाव वेगाने जात असतांना ओव्हरटेक करतांना समोरील येणार्‍या वाहनाचा अंदाज न आल्याने समोरुन जात असलेल्या मोटारसायकल क्रमांक ( एमएच 15 एचएल 3156) या मोटारसायकला धडक दिली.

यावेळी झालेल्या भीषण अपघातात बोलेरो वाहनातील तिन जण तर मोटारसायकलवरील दोघांचा जागीच मृत्यू झाला. यावेळी बोलेरो वाहनातील मुकेश कुमार यादव (25), अमन रामकिसन यादव (18),कुसूमदेवी रामकिसन यादव (45) सर्व रा. ड्रिम कॅसल, नाशिक, (मुळ रा. बनारस, युपी), तर मोटारसायकलवरील अनिल चिमाजी बोडके आणि राहुल अनिल बोडके )रा. शिंप्पी टाकी, ता. निफाड, जि. नाशिक) यांचा जागीच मृत्यू झाला. (latest marathi news)

तर बोलेरो वाहनातील अब्बल रामकिसन यादव (20), विकास कपिलदेव यादव (39), रामकिसन श्रीनाथ यादव (50) हे गंभीर जखमी झाले असून त्यांना पुढील उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघाताची घटना दिंडोरी पोलिस ठाण्याला समजताच पोलिस निरीक्षक रघुनाथ शेगर यांच्या मार्गदर्शनाखाली दिंडोरी पोलिस घटनास्थळी दाखल झाले. दिंडोरी पोलिस ठाण्यात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

द्राक्ष व्यापाऱ्यांसह शेतकऱ्यांमध्ये दुःखाचे वातावरण

रामकेश यादव हे द्राक्षाचे मोठे व्यापारी होते आज सकाळी ते सप्तशृंगी गडावर दर्शनासाठी आपल्या परिवारबरोबर गेले होते. दर्शन करून परत येताना ढकांबे गावाजवळ भीषण अपघात झाल्याने द्राक्ष व्यापारी रामकेश यादव यांच्या सह परिवारातील चार जण ठार झाले आहे त्यामुळे द्राक्ष व्यापाऱ्यांमध्ये व शेतकऱ्यांमध्ये दुःखाचे वातावरण पसरले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT