Municipal Commissioner Chandrakant Pulkundwar and officers inspecting the Ganesh Visarjan procession route. esakal
नाशिक

NMC आयुक्तांकडून मिरवणूक मार्गावर 5 किलोमीटरची रपेट

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : श्रीगणेश विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर बुधवारी (ता. ७) पुन्हा एकदा महापालिका आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी मिरवणूक मार्गाची पाहणी केली. बुधवारी सकाळी तब्बल पाच किलोमीटरचा राउंड मारून तयारीच्या सूचना दिल्या. नाशिक रोड भागातही मिरवणूक मार्गाची व गणेश विसर्जन स्थळांची पाहणी केली. (5 km march along Ganeshotsav 2022 procession route by NMC commissioner Nashik Latest Marathi News)

नाशिक महापालिकेने शहरातील विसर्जन स्थळे आणि मिरवणूक मार्गावर प्राधान्याने लक्ष देऊन विविध कामे पूर्ण केली आहेत. आयुक्त पुलकुंडवार यांनी बुधवारी मुख्य गणेश विसर्जन मिरवणूक मार्गाची सकाळी सात वाजता पाहणी केली. वाकडी बारव ते गौरी पटांगण दरम्यान पाच किलोमीटर मार्गाची पाहणी केली.

नाशिक रोड येथील बिटको पॉइंट ते दसक घाटापर्यंतच्या मार्गाच्या पाहणी नंतर उपाययोजनांच्या सूचना केल्या. मिरवणुक मार्गावर खड्डे, वाहनांचे अतिक्रमण, मार्गावरील स्वच्छता, विद्युत तारा या मुद्द्यांच्या अनुषंगाने कामांचा आढावा घेऊन संबंधित अधिकाऱ्यांना सूचना केल्या.

स्मार्टसिटी कंपनीमार्फत सुरू असलेले उर्वरित कामे त्वरित पूर्ण करण्याचे आदेश दिले. उपायुक्त करुणा डहाळे, अधीक्षक अभियंता शिवाजी चव्हाणके, उदय धर्माधिकारी, शहर अभियंता शिवकुमार वंजारी, कार्यकारी अभियंता सचिन जाधव, संदेश शिंदे, जितेंद्र पाटोळे, रवींद्र धारणकर, स्मार्टसिटीचे सीईओ सुमंत मोरे, जनरल मॅनेजर दिग्विजय पाटील, प्रोजेक्ट मॅनेजर महेश जगताप, विशाल भोसले, एन. एस. पाटील, घनकचरा व्यवस्थापन विभागाचे संचालक डॉ. आवेश पलोड, नितीन धामणे, पूर्व विभागीय अधिकारी नितीन नेर, पश्चिम विभागीय अधिकारी मदन हरीश्चंद्र, पंचवटी विभागीय अधिकारी कैलास राबडिया आणि या विभागांचे स्वच्छता निरीक्षक या वेळी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana Update : लाडक्या बहि‍णींसाठी आनंदाची बातमी! फेब्रुवारी अन् मार्चचा हप्ता एकाच वेळी मिळणार, तारीखही आली समोर...

Summer Travel 2026: यंदा उन्हाळी पर्यटनाला महागाईच्या झळा; विमान कंपन्यांकडून भाडेवाढ शक्य, आधीच बुकिंगचा तज्ज्ञांकडून सल्ला

पोयरी हलु हलु नाच… ऐश्वर्या आणि अविनाश नारकरांचा धमाकेदार डान्स, सोशल मीडियावर viral video

Latest Marathi Live Update: विदर्भ साहित्य संघाच्या निवडणुकीची मतमोजणी सुरू

Latur Police Bharti: लातूरमध्ये पोलिस शिपाई भरतीची आज लेखी परीक्षा; ३२८ उमेदवार सज्ज

SCROLL FOR NEXT