Rape News Nashik esakal
नाशिक

Nashik Crime News : गुरुकुल आश्रमातील आणखी 5 मुलींवर अत्याचार

सकाळ वृत्तसेवा

नाशिक/पंचवटी : म्हसरूळ येथील ज्ञानदीप गुरुकुल आश्रमाचा नराधम संस्थाचालक हर्षल मोरे याच्याविरोधात पॉक्सोअन्वये बलात्कार व ॲट्रॉसिटीअन्वये आणखी पाच गुन्हे दाखल करण्यात आले. मोरे याने आश्रमातील चार अल्पयीन व एका १९ वर्षीय पीडितेवर अत्याचार केल्याची गंभीर बाब पोलिसांच्या चौकशीतून समोर आली आहे.

आश्रमातील मुलींना पोलिसांनी विश्‍वासात घेऊन चौकशी केली असता पीडित मुलींनी आपबिती सांगितली. यामुळे या नराधम संस्थाचालकाविरोधात नव्याने आणखी पाच गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. आदिवासी वाड्या-पाड्यांवरील गोरगरीब मुलींना शिक्षणासाठी आणत त्यांच्यावर अत्याचार केल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. (5 More girls Abused in Gurukul Ashram Nashik Crime News)

म्हसरूळ परिसरातील रो-हाउसमध्ये ‘द किंग’ फाउंडेशन संचालित ‘ज्ञानदीप गुरुकुल आधाराश्रम’ या नावाने संशयित हर्षल बाळकृष्ण मोरे (वय ३२) याने २०१८ मध्ये आश्रम सुरू केला. जिल्ह्यातील आदिवासी वाड्या-पाड्यांवर जाऊन त्याने मुला-मुलींना शिक्षणासाठी या आश्रमात आणले होते.

आजमितीस १४ मुली व १३ मुले आश्रमात वास्तव्याला असल्याचे समजते. दरम्यान, गेल्या १३ ऑक्टोबर ते १२ नोव्हेंबर यादरम्यान त्याने आश्रमातील एका १४ वर्षीय शालेय अल्पवयीन मुलीस पाय दाबण्याच्या बहाण्याने त्याच्या खोलीत बोलाविले. त्या वेळी त्याने पीडित मुलीला मोबाईलवर अश्‍लील व्हिडिओ दाखविले आणि तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. तसेच याबाबत वाच्यता केल्यास आश्रमातून काढून देण्याची धमकीही दिली.

या प्रकाराने भांबावलेल्या पीडितेने नंतर सामाजिक कार्यकर्ते प्रभाकर फसाळे यांना अत्याचाराची माहिती दिली. त्यामुळे आश्रमात नराधम मोरे याच्याकडून सुरू असलेल्या अत्याचाराला वाचा फुटली. या प्रकरणी म्हसरूळ पोलिसात पॉक्सो अन्वये बलात्कार व ॲट्रॉसिटीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला. सदरील गुन्ह्याचा तपास सहायक पोलिस आयुक्त दीपाली खन्ना करीत आहेत.

हेही वाचा : मुदत ठेवीच्या मुद्दलातून टीडीएस कपात? इथे करा तक्रार....

दरम्यान, प्रकरण संवेदनशील आणि आश्रमात मुली वास्तव्याला असल्याने नराधमाकडून आणखीही काही मुलींवर अत्याचार करण्यात आला असावा याची शक्यता होती. त्यादृष्टीने पोलिसांनी आश्रमातील मुलींना विश्‍वासात घेत त्यांच्याकडे चौकशी सुरू केली असता, धक्कादायक माहितीच समोर आली.

नराधम मोरे याने आश्रमातील आणखी पाच मुलींवर अत्याचार केल्याचे उघडकीस आले. यातील चार मुली १४ ते १६ वयोगटातील अल्पवयीन आहेत, तर एक पीडिता १९ वर्षांची आहे. नराधमाने आश्रम सुरू केल्यापासूनच मुलींचा विनयभंगासह लैंगिक अत्याचार केल्याचे चौकशीतून समोर आले आहे. पोलिस उपायुक्त किरणकुमार चव्हाण, सहायक आयुक्त दीपाली खन्ना यांच्यासह पोलिसांनी दोन दिवसांत सखोल चौकशी केली. त्यानुसार, म्हसरूळ पोलिसांत नराधम मोरे याच्याविरोधात पीडितांच्या फिर्यादीनुसार स्वतंत्ररीत्या पॉक्सोअन्वये बलात्कार व ॲट्रॉसिटीचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

"प्रकरण संवेदनसील असल्याने आश्रमातील मुलींना विश्‍वासात घेऊन चौकशी करण्यात आली. त्यातून सदरचा गंभीर प्रकार समोर आला आहे. याबाबत संशयिताविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहे. तपास योग्य रितीने सुरू आहे."

- किरणकुमार चव्हाण, पोलिस उपायुक्त, परिमंडळ १, नाशिक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

इंडिया आघाडीची महारॅली, रामलीला मैदान परिसरात ४ हजार पोलीस, २०० सीसीटीव्ही आणि कंट्रोल रूम

Smile Day 2026: आज ‘स्माइल डे’! एक हसरा फोटो शेअर करा, ‘सकाळ’च्या हास्योत्सवात सहभागी व्हा

Importance of Theatre in Society : मनोरंजनापलीकडे नाटकाची भूमिका; प्रेक्षक, समाज आणि संस्कृतीला समृद्ध करणारी रंगभूमी

मुंबईत CNG महागला, महानगर गॅसने पुन्हा दरात केली वाढ; जाणून घ्या किती आहे दर?

Gold Silver Price : सोन्या-चांदीच्या दरात आठवडाभरात मोठी घसरण; सोनं ५ हजार तर चांदी ३० हजारांनी घसरली

SCROLL FOR NEXT