accident esakal
नाशिक

कारच्या धडकेत 5 जण जखमी

योगेश मोरे

म्हसरूळ : पंचवटीतील इंद्रकुंड येथील पेट्रोलपंपासमोर रस्त्याने जाणाऱ्या कारने बुधवारी (ता. २२) जवळपास तीन ते चार दुचाकींना धडक दिल्याने चार ते पाच जण जखमी झाल्याची घटना घडली आहे. जखमींना उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जखमींमध्ये चार पुरुष व एका महिलेचा समावेश असल्याचे समजते आहे. (5 persons injured in a car accident in front of a petrol pump at Indrakund in Panchavati nashik news)

इंद्रकुंडजवळच्या एका पेट्रोलपंपासमोरून कारचालक बुधवारी पंचवटी कारंजाकडे जात असताना वाहनावरील ताबा सुटला व वाहनाने पाठीमागून तीन ते चार दुचाकींना धडक दिली. या धडकेने दुचाकीस्वार जखमी झाले. झालेल्या अपघातामुळे परिसरातील मुख्य रस्त्यावर वाहतूक कोंडी निर्माण झाली होती.

घटनेचे वृत्त समजताच स्थानिक नागरिक, तसेच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना तत्काळ रुग्णवाहिकेतून खासगी रुग्णालयात औषधोपचारासाठी हलविले. अपघातानंतर पोलिसांनी अपघात करणाऱ्या चालकाला ताब्यात घेतले आहे. बुधवारी झालेल्या पावसामुळे रस्ते ओलेचिंब झाले होते. कदाचित त्यामुळेच चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटून अपघात झाल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. सदर अपघाताबाबत रात्री उशिरा पंचवटी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Petrol-Diesel Price Today: महाराष्ट्रापेक्षा गुजरातमध्ये पेट्रोल तब्बल 10 रुपये स्वस्त! तुमच्या शहरात आजचा दर किती?

Kagal Politics : हसन मुश्रीफ आणि घाटगे एकत्र कसे आले? CM फडणवीसांच्या कागल दौऱ्यापूर्वीच समरजितसिंह घाटगे यांनी स्पष्टच सांगितली पडद्यामागची कहाणी

Bhandardara Accident: भंडारदरा पर्यटनाला गालबोट! मद्यपींची हुल्लडबाजी, भरधाव स्कॉर्पिओच्या धडकेत तरुणीचा मृत्यू

Latest Marathi News Live Update : ग्लासगो राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत आपल्या पथकाने केलेल्या कामगिरीचा मला अभिमान वाटतो- पंतप्रधान मोदी

Buldhana Farmer Loan Waiver: बुलडाण्यात १.१६ लाख पात्र शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर, ६७ हजार ई केवायसी प्रलंबित

SCROLL FOR NEXT