On the occasion of Dr. Ambedkar Jayanti, while inaugurating internet broadband facility for e-learning to Zilla Parishad school students, Prof. Ganesh Khare, Raghunath Ghadge, Pramod Khadtale, Ganesh Kadale, Kashinath Pawar etc. esakal
नाशिक

Nashik News : ई-लर्निंगसाठी 5 वर्षे मोफत इंटरनेट सेवा; वणीच्या रघुनाथ घाडगे यांच्यातर्फे सुविधा

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : कृष्णगाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळेस ब्रॉडबँड इंटरनेट सुविधा देत तसेच विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप व गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव करीत कृष्णगाव येथील ग्रामस्थांनी डॉ. बाबासाहेबांची आदर्शवत जयंती साजरी केली.

गावातील शिक्षणप्रेमी नागरिक रघुनाथ घाडगे यांच्यातर्फे शाळेसाठी पाच वर्षे मोफत ब्रॉडबँड इंटरनेट सुविधा उपलब्ध करून देण्यात आली. (5 years free internet service for e learning to krishnagaon zp school Facilitated by Raghunath Ghadge of Wani Nashik News)

जयंतीनिमित्त या शाळेत युगंधर सांस्कृतिक कला क्रीडा मंचतर्फे आयोजित कार्यक्रमासाठी प्रा. गणेश खरे यांचे डॉ. बाबासाहेब यांच्या जीवनचरित्रावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते.

युगंधर सांस्कृतिक कला व क्रीडा मंच कृष्णगावचे संस्थापक अध्यक्ष प्रमोद खडताळे यांच्यातर्फे विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य, २०२२-२३ या शैक्षणिक वर्षात विविध स्पर्धेत, कार्यक्रमात व परीक्षेत प्रावीण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांना प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले.

मुख्याध्यापक पुष्पक शेवाळे व सर्व शिक्षक तसेच ग्रामसेविका लीना साळुंखे यांचा मंचचे पदाधिकारींच्या हस्ते प्रशस्तीपत्र देऊन सन्मान करण्यात आला. विद्यार्थांना भोजनही मंचतर्फे देण्यात आले. गावातील शिक्षणप्रेमी नागरिक रघुनाथ घाडगे यांच्यातर्फे शाळेसाठी पाच वर्षे मोफत ब्रॉडबँड इंटरनेट सुविधा उपलब्ध करून देण्यात आली.

तिचे उद्घाटन श्री. घाडगे यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमात पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांची भाषणे झाली. विद्यार्थ्यांच्या भाषणावर खूष होऊन प्रा. खरे यांनी मुलांमध्ये वाचनाची गोडी निर्माण व्हावी या उद्देशाने पुस्तक खरेदीसाठी दोन हजार रुपये बक्षीस म्हणून दिले.

हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

ज्येष्ठ नागरिक काशिनाथ पवार यांच्यातर्फे मुलांना बिस्किटे वाटप करण्यात आली. शिक्षिका मोरे यांनीही मुलांना पेन, पेन्सिल, खोडरबर व चॉकलेट वाटप करणार असल्याचे जाहीर करण्यात आले. सरपंच सुनीता कडाळे, उपसरपंच गायत्री महाले, पोलिस पाटील राजेंद्र महाले, युगंधरचे प्रकाश पवार, संग्राम वंजारे, विलास ठाकरे, ग्रामपंचायत सदस्य

सदस्य केशव मोरे, गणेश कडाळे मीराबाई भगरे, सीमाबाई गांगोडे, कमलबाई डंबाळे, दुर्गाबाई गोडे, मनोज कडाळे, ग्रामसेविका श्रीमती लीना साळुंके, जयवंत कडाळे, रघुनाथ गांगोडे, गणेश गांगोडे, कैलास पारधी, राजाराम वाघ, कला क्रीडा मंचचे सर्व सदस्य, शिक्षण प्रेमी नागरिक उपस्थित होते.

मुख्याध्यापक पुष्पक शेवाळे यांनी प्रास्ताविक केले. देवकुमार जाधव यांनी सूत्रसंचालन केले. शिक्षक रमाबाई मोरे, मंगला देवरे, ज्योती ठोंबरे, सुरेश टोपले यांनी संयोजन केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Delhi Crime: शहर हादरलं! एकाच कुटुंबातील चौघांचे मृतदेह घरात आढळले; मृत्यू कशामुळे?

Mumbai News: डोंबिवलीत रस्त्यांची चाळण! नागरिकांचा संताप, प्रशासनाविरोधात रिक्षाचालकांचा ठिय्या

Nashik News : पावसामुळे रस्त्यांची दुर्दशा: सातपूर-अंबड MIDC मधील खड्डेमय रस्ते; कामगार आणि उद्योजक त्रस्त

मराठी बोलणार नाही म्हणणाऱ्या केडियांनी मागितली माफी, चूक सुधारणार म्हणत राज ठाकरेंना केली नम्र विनंती; पाहा VIDEO

मराठीसाठी सत्तेवर लाथ, Raj Thackeray यांनी सांगितला 'तो' प्रसंग । Uddhav Thackeray । Raj Thackeray

SCROLL FOR NEXT