corona update  esakal
नाशिक

Nashik Corona Update : जिल्ह्यात कोरोनाचे 50 सक्रिय रुग्‍ण

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : कोरोनामुक्‍तीकडे वाटचाल करत असताना दीर्घ कालावधीपासून नाशिकमध्ये कोरोनाची लागण झालेल्‍या रुग्‍णांची संख्या घटलेली होती.

परंतु गेल्या काही दिवसांपासून नव्‍याने कोरोनाबाधित अढळून लागल्‍याने सक्रिय रुग्‍णसंख्येत वाढ झाली आहे. सोमवारी (ता. २०) जिल्ह्यात पन्नास कोरोनाबाधितांवर उपचार सुरू होते. (50 active patients of Corona in district Nashik Corona Update news)

हेही वाचा : अदानी..हिंडेनबर्ग आणि भविष्य....

सोमवारी नाशिक महापालिका क्षेत्रातील बारा, नाशिक ग्रामीण भागातील आठ, तर जिल्ह्याबाहेरील एका रुग्‍णाचा कोरोनाचा अहवाल पॉझिटिव्‍ह आला. दुसरीकडे दिवसभरात १९ रुग्‍णांनी कोरोनावर यशस्वीरीत्या मात केली.

असे असले तरी सक्रिय रुग्‍णसंख्येत दोनने वाढ झाली असून, ही संख्या पन्नासपर्यंत पोचली आहे. सध्या नाशिक महापालिका क्षेत्रात २४, नाशिक ग्रामीणमध्ये २२, जिल्‍हाबाहेरील चौघा कोरोनाबाधितांवर उपचार सुरू आहेत.

मालेगाव महापालिका क्षेत्रात सध्या एकही सक्रिय रुग्‍ण नाही. सध्या चाचण्या घटल्‍या असून, पॉझिटिव्‍हीटी रेटमध्ये वाढ झालेली आहे. सोमवारी नाशिक क्षेत्राचा पॉझिटिव्‍हीटी दर ७.९५ टक्‍के, नाशिक ग्रामीणचा पॉझिटिव्‍हीटी दर ६.३० टक्‍के राहिला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Panvel News: पनवेलच्या कळंबोली गेट पंप प्रकल्पावरून नवा वाद, ठाकरे गटाच्या नगरसेविका आक्रमक

IND vs PAK T20 WC: पाकिस्तानला चौथा धक्का; अक्षर पटेलने बाबर आझमला केलं 'क्लिन बोल्ड'

Pune Crime : कल्याणीनगरमध्ये दुचाकीस्वार चोरट्यांनी मोबाईल हिसकावला, येरवडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

Latest Marathi News Live Update : शिवभक्तांच्या वाहनाचा अपघात; एक ठार, १७ जण जखमी

Pune Crime : महापालिका भवनजवळ दुचाकीस्वार चोरट्यांनी तरुणाचा मोबाईल लंपास

SCROLL FOR NEXT