Citylinc
Citylinc esakal
नाशिक

Nashik Citylinc News: नाशिककरांच्या डोळ्यात धूळफेक; 100 टक्के सेवेचा दावा फोल

सकाळ वृत्तसेवा

Nashik Citylinc News: तब्बल सात वेळा संप झाल्यानंतर आता ठेकेदार कंपन्यांनी नियमाप्रमाणे दोनशे बसच चालविण्याचा निर्णय घेतल्याने दोनशे बसच रस्त्यावर धावत आहे. ५० बस बंद असल्याने त्या बसचे २५ टक्के भाडे संबंधितांना अदा करण्याची वेळ सिटीलिंक कंपनीवर आली आहे.

सिटीलिंक कंपनीसंदर्भात ‘आधीच उल्हास त्यात फाल्गुन मास’, अशी स्थिती निर्माण झाली आहे. दुसरीकडे नाशिककरांना शंभर टक्के सेवा देण्याचा दावादेखील फोल ठरला असून तुटपुंज्या सेवेत नाशिककरांचे समाधान केले जात आहे.

त्यामुळे संपूर्ण बससेवेचे ऑडिट करण्याची मागणी येत्या विधानसभेच्या अधिवेशनात केली जाणार आहे. (50 Citylink buses stopped from Diwali nashik news)

एसटी महामंडळाच्या मार्फत व्यवस्थित बससेवा सुरू असताना महापालिकेच्या कर्त्यव्याचा भाग म्हणून तत्कालीन राज्य शासनाने महापालिकेच्या गळ्यात सेवा मारली. ८ जुलै २०२१ पासून शहरात २०० सीएनजी व ५० डिझेल बस सुरू करण्यात आल्या. कोरोनामुळे पहिल्या टप्प्यात केवळ ५० बस सुरू करण्यात आल्या. सिटीलिंक कंपनीमार्फत कंपन्यांना दोनशे किलोमीटरचे भाडे देणे आहे.

८२ रुपये प्रतिकिलोमीटर बसचा दर ठरविण्यात आला. तिकीट व जाहिरातीतून प्राप्त होणारे उत्पन्न महापालिकेला थेट मिळणार आहे. सद्यःस्थितीत जवळपास किलोमीटरला ४५ रुपये प्राप्त होतात. जवळपास ३७ रुपये तोटा किलोमीटर मागे आहे. एकीकडे किलोमीटर मागील तोटा डोकेदुखी ठरत असताना दुसरीकडे सातत्याने संप होत असल्याने सिटीलिंक सेवा बदनाम झाली आहे.

वाहकच नाही

तब्बल सात वेळा कंपनीला संपाला सामोरे जावे लागले. सिटीलिंक कंपनीकडून वाहक पुरविणाऱ्या ठेकेदाराला सातत्याने दंड केला जात आहे. दंडाची रक्कम मोठी झाल्याने ठेकेदाराच्याही जिवावर जात आहे. त्यात कामगारांचे मासिक वेतन, बोनसच्या मुद्द्यावरून संप होत आहे.

ठेकेदारांना नियम दाखविले जात असताना आता ठेकेदाराकडूनदेखील कराराप्रमाणेच बससेवा चालविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याचा परिणाम म्हणून दोनशे बसचा करार ठरला. त्यानुसारच मॅक्स डिटेक्टिव्ह या वाहक पुरवठादाराने तपोवन बस डेपोतून दोनशे वाहक पुरवठ्याचेच काम करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे ५० बस वाहकच नसल्यामुळे त्या बंद ठेवण्यात आल्या आहेत.

कारभार हंगामी अधिकाऱ्यांच्या हाती

५० बस बंद असल्याची बाब सिटीलिंक कंपनीकडून लपवून ठेवण्यात आली असून, यादरम्यान नवीन वाहक पुरवठादार नियुक्ती करण्यात आली आहे. दरम्यान, सिटीलिंक कंपनीचा कारभार हंगामी अधिकाऱ्यांच्या हाती असून त्यांच्यातही एकमेकांमधील वाद टोकाला गेला आहे. त्यामुळे एकंदरीत सिटीलिंकचा कारभार ‘आंधळं दळतयं’ असाच झाला आहे.

"दिवाळीपासून पन्नास बस बंद आहे. टप्प्याटप्प्याने बस सुरू केल्या जातील. नाशिक रोड डेपोतील बससाठी नवीन वाहक पुरवठादाराची नियुक्ती करण्यात आली आहे." - मिलिंद बंड, महाव्यवस्थापक, सिटीलिंक.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loksabha Election 2024 : राज्यातील मतदारसंघांत कुठे रांगा, तर कुठे निरुत्साह

Loksabha Election 2024 : कासवगतीने कासावीस! मतदार चार तास रांगेत

Monsoon : पावसाचा जोर, केरळ ‘अलर्ट मोड’वर

BSP Party : बसपची अस्तित्वाची लढाई; मायावतींचा दबदबा झपाट्याने कमी होऊ लागला

Uddhav Thackeray : मतदान केंद्रात मतदारांकडे दोन ते तीन वेळा ओळखपत्र विचारून ‘जाणीवपूर्वक विलंब’

SCROLL FOR NEXT