Tree Plantation esakal
नाशिक

Nashik Tree Plantation: बळींना कारणीभूत ठरणारे 50 महाकाय वृक्ष हटविणार; पुरातन वृक्षांचे पुनर्रोपण

२०१५ मध्ये नाशिक महापालिकेकडून कुंभमेळ्याचे निमित्त साधून ९० किलोमीटरचे रिंगरोड तयार करण्यात आले.

सकाळ वृत्तसेवा

Nashik Tree Plantation : मागील सिंहस्थ कालावधीमध्ये नव्याने तयार करण्यात आलेल्या रिंगरोडसह रस्ता रुंदीकरणात आलेले मोठे महाकाय वृक्षांमुळे जवळपास ३२ नागरिकांचा बळी गेल्यानंतर उद्यान विभागाने प्राथमिक सर्वेक्षण करून यातील ५० धोकादायक वृक्ष हटविण्याचे नियोजन केले आहे.

वृक्ष हटविताना पुरातन वृक्षांचे पुनर्रोपण केले जाणार असून, एकास पाच नवीन वृक्षांची लागवडदेखील केली जाणार आहे. (50 giant trees causing casualties will be removed nashik news)

२०१५ मध्ये नाशिक महापालिकेकडून कुंभमेळ्याचे निमित्त साधून ९० किलोमीटरचे रिंगरोड तयार करण्यात आले. या रिंगरोडला जोडणारे महत्त्वाच्या रस्त्यांचेदेखील रुंदीकरण करण्यात आले. मात्र, रुंदीकरण व रिंगरोड तयार करताना पुरातन वड, पिंपळ आधी प्रकारचे वृक्ष रस्त्यामध्ये आले. मात्र, वृक्षप्रेमी तसेच नागरिकांच्या विरोधामुळे वृक्ष तोडले गेले नाही. मात्र, गेल्या आठ वर्षात या वृक्षांना धडकून जवळपास ३२ नागरिकांचा बळी गेला आहे.

त्यामुळे वृक्ष की अपघातातील बळी असा अनेकदा प्रश्न निर्माण झाला. मात्र आता बळींची संख्या वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर उद्यान विभागाने सुवर्णमध्य काढत २०० पैकी ५० वृक्ष हटविण्याचा निर्णय घेतला आहे. पन्नास वृक्षांच्या बदल्यात एकास पाच, असे महाकाय वृक्ष लावले जाणार असून, पुन्हा एकदा सर्वेक्षण करून शक्य त्या वृक्षांचे पुनर्रोपण केले जाणार आहे.

अपघाताचे ब्लॅक स्पॉट कमी होणार

छत्रपती संभाजीनगर महामार्गावर अपघात झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अपघाताच्या ब्लॅक स्पॉटचे सर्वेक्षण करून उपयोजना करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्याअनुषंगाने महापालिकेकडून महामार्ग प्राधिकरण, पोलिस शहर वाहतूक शाखा, प्रादेशिक परिवहन विभागाच्या वतीने संयुक्त सर्वेक्षण करण्यात आले.

यात २६ ब्लॅक स्पॉट धोकादायक असल्याचा निष्कर्ष काढण्यात आला. अपघाताला ब्लॅक स्पॉटबरोबरच रस्त्यात येणारे वृक्षदेखील कारणीभूत असल्याचे अहवालात म्हटले आहे. त्याअनुषंगाने रस्त्यावरील महाकाय वृक्ष हटविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

"संयुक्त सर्वेक्षणामध्ये वृक्षांना धडकून ३२ नागरिकांचा बळी गेल्याची बाब समोर आली. रस्त्यामध्ये २०० धोकादायक वृक्ष आहे. त्या वृक्षांचे पुनर्रोपण करण्यासंदर्भात अभ्यास केला जात आहे." - विवेक भदाणे, उद्यान अधीक्षक, महापालिका.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Accident : आषाढी वारीत दुर्दैवी घटना! जेजुरीजवळ ट्रकची वारकऱ्यांना धडक, ३ महिलांचा मृत्यू, ४ गंभीर जखमी

Ashadhi Wari: पंढरपुरात सायकलवारीचा जल्लोष! महाराष्ट्र-कर्नाटकातील ४ हजार सायकलस्वारांची हरिनामाच्या गजरात नगरप्रदक्षिणा

Nagpur: विक्रेत्याच्या चुकीची शिक्षा आता खरेदीदाराला नाही; जीएसटीच्या नियमांमध्ये होणार बदल

Latest Marathi News Live Update : जेजुरीत भीषण अपघात; ट्रकच्या धडकेत तीन वारकऱ्यांचा मृत्यू, सहा वारकरी जखमी

Petrol-Diesel Price Today: अमेरिका-इराण संघर्षानंतर देशात इंधनाचे नवे दर जाहीर! 13 जुलैला पेट्रोल-डिझेल किती रुपयांना?

SCROLL FOR NEXT