cremation wood esakal
नाशिक

14 महिन्यांत नाशिक अमरधाममध्ये जळाली 5 हजार टन लाकडे

विक्रांत मते

नाशिक : एप्रिल 2020 ते मे 2021 या कालावधीमध्ये शहरातील 17 स्मशानभूमींमध्ये मृतदेह जाळण्यासाठी पाच हजार ६९ टन लाकडांचा वापर झाल्याची माहिती घनकचरा विभागाला प्राप्त झालेल्या अहवालातून समोर आली आहे. सर्वाधिक लाकडाचा वापर या वर्षी एप्रिल महिन्यात झाल्याने याच कालावधीमध्ये सर्वाधिक कोविड मृत्यू (Covid Death) झाल्याचा अंदाज लावला जात आहे. (5,000 tons wood burnt in Nashik Amardham in 14 months)

मृतांची संख्या वाढल्याने लाकडाचा वापर अधिक

महापालिकेकडून 2002 पासून मोफत अंत्यसंस्कार योजना राबविली जाते. या योजनेंतर्गत मृतदेह जाळण्यासाठी सात टन लाकूड, रॉकेल व अन्य साहित्य पुरविले जाते. कोरोनाच्या पहिल्या व दुसऱ्या लाटेमध्ये मृतांची संख्या वाढल्याने या कालावधीमध्ये लाकडाचादेखील वापर अधिक झाला आहे. शहरात 17 स्मशानभूमी आहेत. या स्मशानभूमींमध्ये एप्रिल 2020 ते मे 2021 या कालावधीमध्ये पाच हजार 69 टन लाकूड जाळले गेले. मोफत अंत्यसंस्कार योजनेंतर्गत चार ते आठ मण लाकूड वापरले जाते. लहान मुलांसाठी चार मण, तर मोठ्या व्यक्तींसाठी सात मण लाकडाचा वापर होतो. लाकडाच्या एकूण वापरापैकी नाशिक अमरधाममध्ये एप्रिल 2020 ते मे 2021 या कालावधीमध्ये सर्वाधिक एक हजार 731 टन लाकूड मृतदेह जाळण्यासाठी वापरण्यात आले. पंचवटी अमरधाममध्ये 1446.69 टन, सिडको विभागात एक हजार 106 टन, सातपूर विभागात 448.10 , नाशिक रोड विभागात 337.30 टन लाकूड अंत्यसंस्कारासाठी वापरण्यात आले.

(5,000 tons wood burnt in Nashik Amardham in 14 months)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT