Solar  esakal
नाशिक

Nashik News: राज्यात हौसिंग सोसायट्यात 52 मेगावॉट सौर वीजनिर्मिती

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : राज्यातील विविध सहकारी गृहनिर्माण संस्थांनी त्यांच्या इमारतींवर रूफ टॉप सोलर प्रकल्प बसविल्याने राज्यात ३,०२६ हाउसिंग सोसायट्यांनी ५२ मेगावॉट वीजनिर्मिती क्षमता गाठली आहे. (52 MW solar power generation in housing societies in state Nashik News)

रूफ टॉप सोलरमुळे सोसायटीच्या छतावर निर्माण झालेली वीज सोसायटीतील लिफ्ट, पाण्याचे पंप तसेच इमारतीतील जिने व पार्किंग येथील सार्वजनिक दिवे इत्यादी कामांसाठी वापरली जाते. सोसायटीच्या सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्पामध्ये गरजेपेक्षा जास्त वीज निर्माण झाली तर ती महावितरणला दिली जाते.

सौर ऊर्जा निर्मितीपेक्षा जर अधिक विजेची गरज पडली तर ती महावितरणकडून घेतली जाते. महावितरणला सोसायटीकडून मिळणाऱ्या विजेच्या बदल्यात सोसायटीच्या वीजबिलात कपात होते.

वीज वितरण कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल म्हणाले की, ठाण्यात एका गृहनिर्माण संस्थेने ९० किलो वॅट क्षमतेचा सौर ऊर्जा प्रकल्प बसविल्याने त्यांचे दीड लाखाचे वीजबिल ७१ हजारांवर आले.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

दुसऱ्या हाउसिंग सोसायटीने ८० किलो वॅटचा सौर ऊर्जा प्रकल्प बसविल्यानंतर त्यांचे विजेचे बिल १ लाख ४८ हजारांवरून ६६ हजारांवर आले. भांडूपच्या एका गृहनिर्माण संस्थेने ४० किलो वॅटचा सौर ऊर्जा प्रकल्प बसविल्यानंतर त्यांचे १ लाख २० हजार रुपयांचे वीजबिल ३८ हजारांवर आले.

हाउसिंग सोसायट्यांना छतावरील सौर ऊर्जा प्रकल्प बसविण्यासाठी महावितरण मदत करते. महावितरणच्या www.mahadiscom.in/ismart या संकेतस्थळावर संपूर्ण माहिती देण्यात असून ऑनलाइन अर्ज दाखल करण्याची सुविधा आहे.

२० टक्के अनुदान

गृहनिर्माण संस्थांना ५०० किलोवॅट क्षमतेपर्यंतच्या छतावरील सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्पासाठी २० टक्के अनुदान मिळते.

सौर ऊर्जानिर्मितीसाठी वापरलेले पॅनेल्स, वायर्सची गरज, पॅनेल्स बसविण्याच्या स्थानाची स्थिती इत्यादीनुसार खर्चात फरक पडतो. नोंदणी असलेल्या एजन्सीमार्फत प्रकल्प बसविले जातात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bhagyashree Patwardhan : अभिनेत्री भाग्यश्रीने आरती केली, विजयसिंहराजेंचा लेकीसोबतचा वाद पुन्हा उफाळला; राजवाड्याच्या दरबार हॉलमध्ये काय घडलं?

Pune News: महसूल विभागात खळबळ! जमिनींवर परस्पर कुळ लावल्याच्या तक्रारी; राज्यभरातील मंजूर प्रकरणांची तपासणी, महसूलमंत्र्यांनी काय दिले आदेश?

Shirdi Temple: साई चरणी १९ लाखांची सोन्याची छत्री, १ कोटी २० लाखांचा चांदीचा नंदी; गणेश चतुर्थीच्या दिवशी भाविकांकडून अर्पण

Latest Marathi News Update : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात गणपती आगमन सोहळा मिरवणुकीला गालबोट, दोघांचा अपघाती मृत्यू

Maharashtra Weather : राज्यात विजांसह पावसाची शक्यता; पुढील ५ दिवसांचा हवामान अंदाज

SCROLL FOR NEXT