59 corona positive reported In Nashik district esakal
नाशिक

नाशिक जिल्ह्यात दिवसभरात अवघे 59 कोरोना पॉझिटिव्‍ह

अरूण मलाणी

नाशिक : गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात कोरोनाचा घटता प्रादुर्भाव दिलासा देणारा ठरतो आहे. दुसऱ्या लाटेत पन्नास हजारांच्‍या घरात पोचलेली ॲक्‍टिव्‍ह रुग्‍णसंख्या सध्या एक हजारावर स्‍थिरावली आहे. रविवारी (ता. २२) जिल्ह्यात ५९ जणांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्‍ह आले. तर ६३ रुग्‍णांनी कोरोनावर यशस्‍वीरीत्‍या मात केली. दोघा बाधितांचा उपचारादरम्‍यान मृत्‍यू झाला. यातून ॲक्‍टिव्‍ह रुग्‍णसंख्येत सहाने घट झाली असून, सद्यःस्‍थितीत जिल्ह्यात एक हजार ०२ बाधितांवर उपचार सुरु आहेत.

रविवारी नाशिक महापालिका क्षेत्रात २२, नाशिक ग्रामीण क्षेत्रात ३५, मालेगाव महापालिका क्षेत्र व जिल्‍हा बाहेरील प्रत्‍येकी एका बाधिताला कोरोनाची लागण झाली. दिवसभरात दोन बाधितांचा उपचारादरम्‍यान कोरोनामुळे मृत्‍यू झाल्‍याची नोंद असून, दोन्‍ही मृत हे नाशिक ग्रामीण क्षेत्रातील आहेत. ६३ रुग्‍णांनी कोरोनावर यशस्‍वीरीत्या मात केली.

वीस लाख अहवाल निगेटिव्‍ह

आत्तापर्यंत जिल्ह्यात एकूण चोवीस लाख आठ हजार ८८३ रुग्‍णांच्‍या स्‍वॅब चाचण्या करण्यात आल्‍या. त्यापैकी चार लाख चार हजार ६६३ रुग्‍णांचे अहवाल पॉझिटिव्‍ह आले आहेत. तर तब्‍बल वीस लाख चार हजार ०३८ रुग्‍णांचे अहवाल निगेटिव्‍ह आले आहेत.

प्रलंबित अहवालांची घटलेली संख्यादेखील दिलासादायक ठरते आहे. दैनंदिन अहवालानुसार सायंकाळी उशीरापर्यंत अवघे १८२ अहवाल प्रलंबित होते. यात नाशिक महापालिका क्षेत्रातील १११, मालेगाव महापालिका क्षेत्रातील ६४, तर नाशिक ग्रामीणमधील सात रुग्‍णांना अहवालाची प्रतिक्षा होती. जिल्‍हाभरातील रुग्‍णालये व गृहविलगीकरणात ९७२ रुग्‍ण दाखल झाले. यात नाशिक महापालिका क्षेत्रातील ९६२ रुग्‍णांचा समावेश आहे. जिल्‍हा रुग्‍णालयात सहा, डॉ. वसंत पवार वैद्यकीय महाविद्यालयात एक रुग्‍ण दाखल झाला. नाशिक ग्रामीणमधील दोन, मालेगावच्‍या एका रुग्‍णाचा समावेश आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Crime: भावजयचे दिरासोबत अनैतिक संबंध, जाऊबाई संतापली, भर पंचायतीत ॲसिडची बाटली आणली अन्...; धक्कादायक कृत्य

Latest Marathi News Live Update : जैन मुनि नयपद सागर यांच्या ताराराणींबाबतच्या वक्तव्यावरून वाद वाढला

मोठे अपडेट्स : IPL मध्ये १० नव्हे १२ संघांमध्ये जेतेपदाची स्पर्धा रंगणार? BCCI चा मास्टर प्लान, शंभरच्या आसपास लढती होणार...

'दारु प्यायचो, मासांहार करायचो, दिवसाला 200 सिगारेट ओढायचो' अमिताभ बच्चन यांनी केलेला खुलासा, म्हणालेले...'इतकी दारू प्यायचो की...'

2011 World Cup India Team: २०११ फायलनच्या भारताच्या प्लेइंग इलेव्हनमधील हिरो आत्ता काय करतात, दोन खेळाडू अद्यापही IPL खेळतात

SCROLL FOR NEXT