Grapes
Grapes esakal
नाशिक

Grapes Cover Subsidy : द्राक्षांच्या प्लास्टिक आच्छादनासाठी राज्य सरकारतर्फे 6 कोटींना मान्यता

सकाळ वृत्तसेवा

Grapes Cover Subsidy : द्राक्ष उत्पादकांची प्रतीक्षा आता संपली असून राष्ट्रीय कृषी विकास योजनेतंर्गत द्राक्षांसाठी प्लास्टिक आच्छादनाला राज्य सरकारने ६ कोटी १४ लाख निधी वाटपास मान्यता दिली आहे.

योजनेतंर्गत शेतकऱ्यांना ५० टक्के खर्च करावा लागणार असून अनुदान ५० टक्के मिळणार आहे. (6 crore sanctioned by state government for plastic covering of grapes nashik news)

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखालील राज्यस्तरीय प्रकल्प मंजूर समितीमध्ये अर्थसहाय्य योजना २०२२-२३ मध्ये राबवण्यास मान्यता देण्यात आली होती. प्रकल्पातंर्गत १२ कोटी १६ लाख रुपयांचा कार्यक्रम राबवण्यात येणार आहे.

योजनेच्या मंजूर निधीपैकी केंद्र सरकारचा ६० आणि राज्य सरकारचा ४० टक्के हिस्सा राहणार आहे. पुण्याचे राज्य फलोत्पादन आणि औषधी वनस्पती मंडळाचे संचालक नियंत्रण अधिकारी असतील. प्रकल्पातंर्गत लक्षांक आणि निधी वाटप द्राक्षाच्या क्षेत्रानुसार जिल्हानिहाय मंडलस्तरावरुन करण्यात येईल.

महाडिबीटी प्रणालीवर शेतकऱ्यांचे अर्ज प्राप्त झाल्यावर निवड लॉटरी पद्धतीने केली जाईल. सक्षम अधिकाऱ्यांनी पूर्व संमती दिल्यानंतर आणि काम पूर्ण झाल्याची तपासणी झाल्यावर अनुदान आधार लिंक शेतकऱ्यांच्या बँक खात्यात वर्ग करण्यात येईल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ICC Champions Trophy 2025 : चॅम्पियन्स ट्रॉफी खेळण्यासाठी भारत पाकिस्तानात जाणार? बीसीसीआयनं स्पष्टच सांगितलं

Viral Video: 'बाबा वारले,आई सोडून गेली..' रोल विकणाऱ्या १० वर्षांच्या मुलाची हिंमत पाहून भारावले आनंद महिंद्रा, केली मोठी घोषणा

Bomb Hoax in 16 Schools: मतदानादिवशी 16 शाळांना बॉम्बनं उडवून देण्याची धमकी! रशियातून आला ईमेल ? पोलिसांचं धाबं दणाणलं

Heeramandi The Diamond Bazar : भन्साळींच्या भाचीला नेटकऱ्यांनी केलं ट्रोल; 'या' अभिनेत्रीने ट्रोलर्सला सुनावले खडेबोल

Panchayat 3: प्रमोशनची हटके पद्धत; भाजी मंडईतील दुधीभोपळ्यावर 'पंचायत'चं नाव, व्हिडीओ व्हायरल

SCROLL FOR NEXT