molestation esakal
नाशिक

Nashik Crime News : अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणाऱ्याला 6 महिने शिक्षा

सकाळ वृत्तसेवा

मालेगाव (जि. नाशिक) : शहरातील माळी नगर भागातील दहावी इयत्तेत शिकणाऱ्या काकाणी विद्यालयातील अल्पवयीन मुलीचा पाळत ठेवून पाठलाग करत तिचा विनयभंग केल्याच्या आरोपावरुन शशिकांत उर्फ सचिन बागूल (रा. शिवाजीनगर) याला येथील न्यायालयाने गुन्हा सिध्द झाल्याने सहा महिने कारावास व चार हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. (6 months imprisonment for molesting minor girl Nashik Latest Crime News)

अल्पवयीन पिडीता दहावीत शिक्षण घेत होती. ५ ऑगस्ट २०१५ पासून शशिकांत उर्फ सचिन बागूल हा तिच्यावर पाळत ठेवून वाईट उद्देशाने तिचा पाठलाग करीत असे. पिडीतेच्या आई- वडिलांनी त्याला पाठलाग करत असतानाच पकडून किल्ला पोलिसांच्या ताब्यात दिले होते. संशयित आरोपीविरुद्ध पिडीतेच्या तक्रारीवरुन किल्ला पोलिस ठाण्यात विनयभंग व बाल लैंगिक अपराध पोक्सो अन्वये गुन्हा दाखल करुन उपनिरीक्षक बी. आर. बैरागी यांनी तपास करत खटला न्यायालयात पाठविला होता.

विशेष पोक्सो न्यायालयातील अतिरिक्त सह जिल्हा न्यायाधीश एस. सी. मगरे यांच्या समोर या खटल्याचे कामकाज चालले. सरकार पक्षातर्फे ॲड. संजय सोनवणे यांनी पाच साक्षीदार तपासले. त्यांना पोलिस निरीक्षक दिगंबर भदाणे, हवालदार भास्कर पगार यांनी सहाय्य केले. संशयिताविरुद्ध गुन्हा सिद्ध झाल्याने दोन वेगवेगळ्या कलमाखाली प्रत्येकी तीन याप्रमाणे सहा महिने शिक्षा व प्रत्येकी दोन हजार रुपये दंड या प्रमाणे चार हजार रुपये दंड, दंड न भरल्यास अतिरिक्त एक महिन्याच्या कारावासाची शिक्षा न्यायाधीश मगरे यांनी सुनावली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

World Record: साई सुदर्शनचा विश्वविक्रम! IPL 2026 मध्ये ऑरेंज कॅपही मिळवली अन् T20 मध्ये भल्याभल्यांना जे जमलं नाही, ते करून दाखवलं

KKR vs GT, IPL Points Table: शुभमन गिलचं शतक हुकलं अन् कोलकाताने रोखला गुजरातचा विजयरथ! KKR चं प्लेऑफचं आव्हान जिवंत

NEET पेपर लीकनंतर NTAमध्ये मोठा प्रशासकीय फेरबदल! दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांची नियुक्ती; सरकारचं निर्णायक पाऊल

१० संघ अन् १३ शतकं... IPL च्या १९ वर्षांच्या इतिहासात याआधी जे कधीच घडलं नव्हतं ते यंदा घडलंय!

केंद्रीय मंत्र्याच्या मुलाला पोक्सो अंतर्गत दाखल गुन्ह्यात अटक; १७ वर्षीय मुलीला लग्नाचं आमिष दाखवून ठेवले संबंध

SCROLL FOR NEXT