leopard
leopard esakal
नाशिक

Nashik News : ठाणगाव येथे 6 वर्षाचा बिबट्या जेरबंद

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : सिन्नर तालुक्यातील ठाणगाव येथील लावदरी परिसरात शुक्रवारी (दि.१२) रोजी पहाटे पाच वाजेच्या सुमारास सहा वर्षे वयाचा नर जातीचा बिबटया जेरबंद झाल्याने परिसरातील शेतकऱ्यांनी सुटकेचा निश्वास सोडला. (6 year old leopard jailed in Thangaon nashik news)

पंधरा दिवसापूर्वी लावदरी परिसरातील शेतकरी रमेश हरी पानसरे यांच्या गोठ्यातून दोन वासरे बिबटयाने ओढून ठार मारले होते पण वासरे जंगलात ओढून नेल्याने वासराचा कोणताही पुरवा नसल्याने वनविभागाच्या वतीने पंचनामा केला नाही. त्यानंतर पानसरे यांनी सदर ठिकाणी बिबटयाचा दहशत असल्याने वनविभागाकडे पिंजरा लावण्याची मागणी केली.

लावदरी परिसरात पिंजरा लावण्यात आला. शुक्रवारी (दि.१२) रोजी पहाटेच्या सुमारास बिबटया पिंजऱ्यात अडकला त्यानंतर पानसरे यांचा मुलगा विक्रम हा शेतात गेला असता त्यास बिबटयाच्या डरकाळ्या येऊ लागल्याने बिबटया पिंजऱ्यात अडकल्याचे दिसून आले.

त्यानंतर वनविभागाला सदर घडनेची माहिती दिली असता वनविभागाच्या वतीने वनपाल सुनिल झोपे, वनरक्षक किरण गोर्डे, पी.जी.बिन्नर,वनमंजूर भारत गांगड, काशिनाथ कातोरे,आजय गि-हे, बाळू गांगड यांनी सदर जखमी अवस्थेत असलेल्या बिबटयाला मोहदरी येथील वनउद्योनात नेले.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

बिबटयाने पिंजऱ्यात असणाऱ्या तारेला ओढण्याचा प्रयत्न केल्याने व पिंजऱ्याला धडकी दिल्याने बिबटयाला तोंडाला जखम झाली असून त्यास मोहदरी येथील वनउद्योनात ठेवण्यात आले आहे. पशु वैद्यकीय अधिकारी थोरात यांनी जखमी बिबटयावर उपचार करुन वनविभागाचा देखरेखीत ठेवण्यात आला आहे.

बिबटयाची दशहत अजूनही कायम

लावदरी भागात झांडाचे प्रमाण जास्त असल्याने या भागात बिबटयाच्या जोडीचा वावर कायम असून गेल्या आठ दिवसांपासून उष्णतेचे प्रमाण वाढल्याने व जंगलातील वृक्षाची पानगळ झाल्याने वन्यप्राणानां लपण्यासाठी सावली नसल्यामुळे बिबटे व अन्य वन्यप्राणी गावकुसाकडे अन्न व पाण्याच्या शोधार्थ फिरतानां दिसत आहे.

लावदरी परिसरात एक बिबटया जेलबंद झाला असला तरी एक बिबटया मुक्त असून त्याला पकडण्यासाठी पुन्हा पिंजरा लावण्यात यावा अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs DC : दिल्ली पॉईंट टेबलमध्ये मोठी उसळी घेणार की जेक फ्रेसर मॅर्कगर्कला केकेआर रोखणार?

CSK vs SRH IPL 2024 : चेन्नईनं पुन्हा जिंकला चेपॉकचा गड; हैदराबादची इतिहासातील सर्वात मोठी हार

Sambhajinagar : राज्यातील पहिल्या मोसंबी ग्रेडींग व्हॅक्सीन व कोल्ड स्टोरेज केंद्राचे काम पूर्णत्वाकडे

Share Market : शेअर बाजारातील किरकोळ गुंतवणूकदारांच्या संखेत वर्षात ४.०३ कोटींची वाढ; देशात 'हे' राज्य आघाडीवर

Pune Traffic Updates : पुणे विद्यापीठ चौकातील मेट्रोच्या कामानिमित्त वाहतुकीत बदल

SCROLL FOR NEXT