Nashik Land Records Office : भूमिअभिलेख कार्यालयात शेतकऱ्यांची दिशाभूल! हेतुपुरस्सर चुकांची निर्मिती

Land Records
Land Recordsesakal

Nashik Land Records Office : शासकीय कार्यालयात सध्या नाशिकचे भूमिअभिलेख कार्यालय वेतन व्यतिरिक्त पैसे कमविण्याचे मोठे साधन मानले जात आहे.

सध्या सदर कार्यालयाबाबत असंख्य तक्रारी असताना वरिष्ठ अधिकारी मात्र मूग गिळून बसलेले दिसून येतात. जमिनींची मोजणी करताना खातेदारांची दिशाभूल केली जाते, असा आरोप मखमलाबाद येथील शेतकरी संजय पडोळ यांनी केला. (Misled farmers in land records office Intentional creation of errors nashik news)

सिटी सर्वे लागू करताना असंख्य चुका केलेल्या दिसून येतात. सदर चूक हेतुपुरस्सर केली आहे की काय, अशा शंका उपस्थित होत आहे. जमिनीची मोजणी करताना आणि नंतर स्वतंत्र पोटहिस्से असताना ते संबंधितांना देऊनही त्यांनी सर्व हिस्सा एकत्र करून एकच नंबर तयार केला.

मात्र व्यावसायिक लोकांचे स्वतंत्र हिस्सा नसताना त्यांचे मात्र १ गुंठा २ गुंठा असे हिस्सा केले. काही ठिकाणी ज्याच्या लाभात इतरांनी हक्कसोड पत्रक दिले त्यांचेच नाव कमी केले आणि नावं लावायला पुन्हा अर्ज अपील करण्यासाठी सल्ला दिला जातोय.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Land Records
NMC News : 8 वर्षांपासूनच्या थकबाकी वसुलीसाठी मोहीम उघडण्याचा निर्णय

हे सर्व करायचा उद्देश सर्वश्रुत आहे. याबाबत वरिष्ठ अधिकारी लक्ष घालून न्याय मिळवून देतील काय, अशी विचारणा नाशिककर करत आहे. कारण या कार्यालयातील प्रत्येक महिन्यात एक व्यक्ती लाच घेताना पकडलेली दिसून येते.

सध्या शेतकरी मेटाकुटीला आलेला असताना हे लोक शासकीय पगार घेऊन शेतकऱ्यांना लुटण्याचे कुटिल कारस्थान करण्यात दंग असल्याचे दिसून येतात आणि त्यांचे वरिष्ठ त्यांना कुठलाही प्रतिबंध न करता जणूकाही ते याचे समर्थन करतात असेच सध्या वातावरण नाशिक विभागात आहे, असे पडोळ यांनी निवेदनात म्हटले आहे.

Land Records
NMC News : शहराला कोणी वाली आहे का? ना प्रशासन प्रमुख, ना लोकप्रतिनिधी; तक्रारींचा ढिग!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com