Anandacha Shidha sakal
नाशिक

Anandacha Shidha: निफाड तालुक्यात 66 हजार लाभार्थ्यांना आनंदाचा शिधा! गौरी, गणपती आणि दिवाळी सण होणार गोड

सकाळ वृत्तसेवा

: अंत्योदय व प्राधान्य शिधापत्रिकाधारक कुटुंबाचा गौरी, गणपती आणि दिवाळी सण गोड होणार आहे. शासनाने शंभर रुपयांत आनंदाचा शिधा देण्याचा निर्णय घेतला आहे. १०० रुपयांत एक किलो रवा, चना डाळ, साखर व एक लिटर खाद्यतेल मिळणार आहे.

निफाड तालुक्यात ६६ हजार लाभार्थ्यांना शिधा किट मिळणार आहे. खाद्यतेल वगळता इतर शिधा तालुक्याला प्राप्त झाला आहे. लवकरच आनंदाचा शिधा किटचे वितरण होणार आहे. (66 thousand beneficiaries in Niphad taluka of happiness Gauri Ganpati and Diwali festivals will be sweet nashik)

मागील वर्षी दिवाळीपासून आनंदाचा शिधा देण्यास सुरवात झाली. पुरवठा विभागातर्फे शहरांसह ग्रामीण भागात रेशन दुकानदारांमार्फत १०० रुपयांत हा शिधा देण्यात आला. आनंदाचा शिधा किटमध्ये साखर, रवा, डाळ हे प्रतिएक किलो, तर एक लिटर पामतेल मागील वर्षाप्रमाणे मिळणार आहे.

मागील वर्षी पहिलीच वेळ असल्याने लाभार्थ्यांपर्यंत काही वस्तू पोहोचण्यास विलंब झाला. यंदा मात्र आनंदाचा शिधा वाटपासाठी आतापासून तयारी करण्यात येत आहे. या योजनेपासून लाभार्थी वंचित राहू नये, याची दक्षता घेण्यात येत आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

गणेशोत्सव आणि दिवाळीला पात्र लाभार्थ्यांना शिधा देण्यात येणार आहे. यात अंत्योदय अन्न योजना, प्राधान्य कुटुंब शिधापत्रिकाधारक, शेतकरी आत्महत्याग्रस्त, दारिद्रयरेषेखालील, तसेच केशरी शिधापत्रिकाधारकांना हा शिधा मिळणार आहे.

गणेशोत्सवापूर्वी आनंदाचा शिधा वाटपासाठी पुरवठा विभागाच्या निफाड तालुकातील १५४ रेशन दुकानांतून ६६ हजार लाभार्थ्यांना वेळत आनंदाचा शिधावाटपाचे नियोजन करण्यात आले आहे.

"आनंदाचा शिधा वितरण वेळेत करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.रेशन दुकान धारकांना तशा सुचना देण्यात आल्या आहेत.लवकरच किटचे वाटप सुरू करण्यात येणार असुन लाभार्थ्यींनी लाभ घ्यावा." -उल्हास टर्ले, पुरवठा अधिकारी, निफाड

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

रशियन तेल खरेदी करणाऱ्यांवर अमेरिकेकडून शंभर टक्के टॅरिफ; ट्रम्प यांच्या प्लॅनवर भारताची पहिली प्रतिक्रिया

Koyna Dam: कोयना धरणाचा मध्यरात्री मोठा विसर्ग! 23,520 क्युसेक पाणी नदीत; कृष्णा-कोयना काठावरील गावांना अलर्ट

Commonwealth Games 2026: भारताची 'ज्युदो'त पदक हॅटट्रिक! LIC एजंटच्या लेकीच्या जिद्दीला सलाम; कोण आहे यामिनी मौर्य?

Leopard Attack: श्वानाच्या धाडसाने बिबट्याला पळवले! पुरंदरात कालवडीवरचा हल्ला फसला, मध्यरात्री रंगला थरार..

Cultural Heritage: मुसळधार पावसाचा सांस्कृतिक वारशाला तडा! कवयित्री शांता शेळके यांच्या ऐतिहासिक वाड्याचा भाग कोसळला

SCROLL FOR NEXT