Nashik-Road-Jail Google
नाशिक

नाशिक रोड कारागृहातील 675 कैदी पॅरोलवर

विनोद बेदरकर


नाशिक : कोरोनाचा प्रभाव राज्यातील कारागृहावर झाला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर एकट्या नाशिक रोड कारागृहातील ६७५ अंडर ट्रायल, तर ४७५ शिक्षाबंदी जामिनावर सोडले आहे. कोरोना महामारीत रखडलेले लसीकरण हे त्यामागचे प्रमुख कारण सांगितले जाते.(675 under trial prisoners of Nashik Road Jail have been released on bail)


देशात लसीकरण मोहीम जोरात आहे. पोलिसांसह सुरक्षा दलातील कर्मचाऱ्यांना प्राधान्य देण्यात आले. मात्र यात विविध कारागृहांत शिक्षा भोगणारे कैदी मात्र लसीकरणापासून दूर आहे. लसीकरण मोहीम सुरू असतांना अनेक कैदी लस घेण्यास प्रतिसाद देत नाही, हेही कारण सांगितले जाते. त्यामुळेच राज्यातील ४६ कारागृहांतील आठ हजारांहून अधिक कैद्यांचे लसीकरण त्यामुळे रेंगाळले आहे. यात नाशिक कारागृहातील ९० कैद्यांचे लसीकरण अद्याप बाकी आहे. लसीकरण मोहिमेसोबतच कोरोनानिमित्ताने जामिनावर बाहेर असलेल्यांची संख्या मोठी आहे. यात राज्यात सर्वाधिक ६७५ कैदी नाशिक रोड कारागृहतून सोडण्यात आले आहे. राज्यातील सगळ्या कारागृहांत २४ हजार ७२१ कैदी असून, त्यातील १६ हजार ३६९ कैद्यांचे लसीकरण झाले आहे. त्यातही नाशिक रोड कारागृहातील दोन हजार ३३४ पैकी दोन हजार २४४ कैद्यांचे लसीकरण झाले आहे. तर दहा कैद्यांना लस घ्यायची नसल्याचे त्यांनी म्हटले आहे.


नाशिक रोडला खुले कारागृह

राज्यातील कारागृहातील कैद्यांच्या क्षमतेपेक्षा ३४ टक्के जास्त कैदी असून, कैद्यांची सोय करण्यासाठी राज्यात ठिकठिकाणी नवीन कारागृह उभारण्याचे नियोजन सुरू आहे. याचाच एक भाग म्हणून नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहालगत नवीन इमारत उभारतांना पैठण कारागृहाच्या धर्तीवर नाशिक रोडला गोरेवाडी परिसराला लागून खुले कारागृह (ओपन जेल) उभारता येणार का, याचाही विचार सुरू आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolhapur Police : पोलिस अधिकाऱ्याच्या गळ्यातील ताईत डिपार्टमेंट बदनाम करतोय, मोका प्रस्ताव रद्द करण्यासाठी ६५ लाखांची केली मागणी अन्...

Bachchu Kadu : 'शेतकरी एकत्र येत नाही, हाच सर्वांत मोठा शोक'; बच्चू कडूंचा सरकारवर घणाघात

Kolhapur Dairy Scheme : गोकुळ दूध संघ शेतकऱ्यांना भरभरून देतय, शेतमजूर, अल्पभूधारकांना आणली आता नवी योजना, काय आहे फायद्याची स्कीम

Nirav Modi: प्रत्यार्पण खटला पुन्हा सुरू करा; नीरव मोदीस मानसिक आणि शारीरिक छळाची भीती

Latest Marathi News Live Update: राज्याला दुष्काळ मुक्त करण्याच्या दिशेने काम सुरु - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

SCROLL FOR NEXT