corona updates nashik 
नाशिक

नाशिक जिल्ह्यात दिवसभरात कोरोनाचे 697 नवीन बाधित; नऊ रुग्णांचा मृत्यू

अरुण मलाणी

नाशिक : जिल्ह्यात नव्याने आढळलेल्या बाधितांची संख्या ही कोरोनामुक्‍त रूग्णांपेक्षा अधिक असल्याने सलग दुसऱ्या दिवशी ॲक्‍टिव्‍ह  रूग्णांमध्ये वाढ झाली. गुरूवारी (ता.15) दिवसभरात 697 नवीन बाधित आढळले, तर 623 रूग्णांनी कोरोनावर मात केली असून, नऊ रूग्णांचा मृत्यू झाला. यातून ॲक्‍टिव्‍ह रूग्ण संख्येत 65 ने वाढ झाली असून, सद्य स्थितीत जिल्ह्यात 7 हजार 682 बाधितांवर उपचार सुरू आहेत.

गुरूवारी नव्याने आढळलेल्या बाधितांमध्ये नाशिक शहरातील 352, नाशिक ग्रामीणचे 319, मालेगावचे 18 तर जिल्हाबाह्य आठ नवीन कोरोना बाधित आढळून आले आहेत. तर कोरोनामुक्‍त झालेल्या रूग्णांमध्ये नाशिक शहरातील 465, नाशिक ग्रामीणचे 106, मालेगावचे 40 तर जिल्हाबाह्य बारा रूग्णांनी कोरोनावर मात केली आहे. दिवसभरात झालेल्या नऊ मृत्यूंमध्ये पाच रूग्ण नाशिक महापालिका हद्दीतील असून, चार नाशिक ग्रामीणच्या रूग्णांचा मृत्यू झालेला आहे. यातून कोरोना बाधितांची संख्या 87 हजार 888 वर पोहचली असून, यापैकी 78 हजार 642 रूग्ण कोरोनामुक्‍त झालेले आहेत. 1 हजरी 564 रूणांचा मृत्यू झाला आहे.

दिवसभरात दाखल संशयितांमध्ये नाशिक महापालिका रूग्णालये व गृहविलगीकरणात 1 हजार 021, नाशिक ग्रामीण रूग्णालये व गृहविलगीकरणात 93, मालेगाव महापालिका रूग्णालये व गृहविलगीकरणात दहा, डॉ. वसंत पवार वैद्यकीय महाविद्यालयात 14 तर जिल्हा रूग्णालयात पाच संशयित दाखल झाले आहेत. सायंकाळी उशीरापर्यंत 803 संशयितांचे अहवाल प्रलंबित असून, अनेक दिवसांनंतर प्रलंबित अहवालांचा आकडा एक हजारांच्या आत आला आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Online Betting : ऑनलाइन बेटिंगमुळे कर्ज झाल्याने संपविले जीवन; प्रथमेशच्या लेटर नोटमधील माहिती

Palghar News : रुग्णालयातील राड्याला न्यायालयाचा दणका! राहुल घरतची कोठडी वाढली, तिघांचा अटकपूर्व जामीनही फेटाळला आणि अटक वॉरंटची मागणी

Marathi News Live Updates : हडपसरमधील माळवाडीत आठ घरे आगीत भस्मसात; एका घरात सिलेंडरचा स्फोट

Shirur Maratha reservation protest: शिरूरमध्ये मनोज जरांगे यांच्या उपोषणाला पाठिंबा; मराठा आरक्षणासाठी पुणे–नगर मार्गावर रास्ता रोको

Takli Rajeray Crime : टाकळी राजेराय पोलिसांची धडक कार्यवाही; दोनशे किलो गोमांस जप्त

SCROLL FOR NEXT