Adhar Card  esakal
नाशिक

Adhar Card: 7 लाख 40 हजार विद्यार्थी ‘आधार’विना! राज्याचे चित्र

रवींद्र मोरे

बिजोरसे : शालेय शिक्षण विभागाकडून विद्यार्थ्यांच्या आधार नोंदणी आणि अद्ययावत करण्याबाबत वारंवार सूचना देऊनही राज्यातील तब्बल सात लाख ४० हजार १७६ विद्यार्थ्यांकडे आधारकार्ड नसल्याचे, तर सहा लाख ७० हजार ७२ विद्यार्थ्यांच्या माहितीत विसंगती असल्याचे निदर्शनास आले आहे. शाळांनी तातडीने दुरुस्त करावी, असे शिक्षण विभागाने म्हटले आहे. (7 lakh 40 thousand students without Aadhar Card Picture of State nashik)

विद्यार्थ्यांसाठी गणवेश आणि पाठ्यपुस्तक वाटप, शालेय पोषण आहार, विविध प्रकारच्या शिष्यवृत्ती योजना, तसेच शाळांना विद्यार्थिसंख्येनुसार अनुदान देण्यात येते.

बोगस पटसंख्या रोखण्यासह ‘आधार’नुसार योजनांचे लाभ देण्यासाठी राज्यातील पहिली ते बारावीच्या विद्यार्थ्यांच्या आधारकार्ड नोंदणी अद्ययावतीकरणाचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यासाठी शाळांना विद्यार्थ्यांच्या आधारकार्डवरील माहिती स्टुडंट पोर्टलमध्ये नोंदविण्याची सक्ती करण्यात आली आहे.

संबंधित काम अद्याप पूर्ण झालेले नाही. शिक्षण विभागाकडून शाळांची संचमान्यता ही आधार संख्येवरच केली जाणार असल्याने ते कामही प्रलंबित आहे.

शिक्षण विभागाच्या सरल संकेतस्थळावरील आकडेवारीनुसार राज्यात दोन कोटी सात लाख ७७ हजार ६३९ विद्यार्थ्यांपैकी दोन कोटी ३७ हजार ४६३ विद्यार्थ्यांची माहिती स्टुडंट पोर्टलवर भरण्यात आली आहे.

त्यापैकी एक कोटी ८८ लाख २६ हजार २१८ विद्यार्थ्यांची आधारकार्डवरील माहिती वैध ठरली आहे. सहा लाख ७० हजार ७२ विद्यार्थ्यांची सरल संकेतस्थळावरील माहिती आणि आधारकार्डवरील माहिती विसंगत आहे. या माहितीमधील विसंगती शाळांनी दूर करण्याबाबत स्पष्ट केले आहे.

"अनेक विद्यार्थी व पालक आधारकार्डची दुरुस्ती करीत नाहीत. वारंवार सांगूनही दुर्लक्ष करतात. जे विद्यार्थी हजेरी पत्रकावर आहेत, तेच विद्यार्थी सरळ पोर्टलवर ग्राह्य धरावेत. दाखला पडताळणी केलेली असते, त्यानुसार संख्या निश्चित होते. तसेच संचमान्यता ऑनलाइन न करता ऑफलाइन करावी."

- प्रा. डॉ. संजय शिंदे, अध्यक्ष, महाराष्ट्र कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटना, मुंबई

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manoj Jarange: ३० मेपासून तळपत्या उन्हात आमरण उपोषण, जीव गेला तर फडणवीस जबाबदार... मनोज जरांगे यांची कठोर भूमिका!

Arya Avdhut Success Story : महाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचा तुरा; आर्या अवधूतचा राष्ट्रीय सौंदर्य स्पर्धेत विजय

Randhir Singh: क्रीडा प्रशासक रणधीर सिंग यांचे निधन; प्रदीर्घ आजाराने ७९व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

स्कॉर्पिओला आग लागून एकाच कुटुंबातील चौघांचा अंत, मृतांमध्ये ZP सदस्यासह २ माजी सरपंचाचा समावेश

Latest Marathi News Live Update : मनोज जरांगेंची पत्रकार परिषद! 30 मे पासून आमरण उपोषण

SCROLL FOR NEXT