liquor  esakal
नाशिक

Nashik News : थर्टीफर्स्टसाठी 7 लाख मद्यपींनी घेतले परवाने; नववर्षांसाठी 3 दिवसातील विक्रम

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : अवघ्या चार दिवसांवर येऊन ठेपलेल्या नववर्षाच्या स्वागताची तळीरामांकडून जय्यत तयारी सुरू झाली आहे. या तयारीवर ऐनवेळी येणारे विघ्न टाळण्यासाठी तीन दिवसात शहरातील ७ लाख तळीरामांनी मद्यपानाचे परवाने घेतले आहेत. यात तीन दिवसात तेवढीच वाढ होण्याची शक्यता आहे, त्यामुळे किमान पंधरा लाख तरी अधिकृतरित्या मदिरेचा आश्‍वाद घेणार असल्याचे मानले जात आहे. (7 lakh alcoholics take licenses for 31st Party nashik news)

हे ऑनलाईन परवाने राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून दिले जातात. अवैध मद्यवाहतुकीवर कारवाईसाठी उत्पादन शुल्क विभागाने कंबर कसली असून याकाळात नाकाबंदी करून विशेष पथके तैनात केली आहेत. दरम्यान, यंदा प्रथमच नववर्षांच्या पहाटेच्या पाचपर्यंत मद्यविक्री दुकानांनाही परवानगी मिळाल्याने तळीरामांमध्ये उत्साह दुणावल्याचे चित्र आहे. शासनाच्याही महसुलात भरमसाठ वाढ होण्याची शक्यता आहे.

राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून तळीरामांसाठी वैयक्तिक स्वरुपापासून ते पाटर्यांमध्ये केल्या जाणाऱ्या मद्यपानापर्यंतचे परवाने दिले जाते. यामध्ये एकदिवसीय, वार्षिक व आजीवन अशा स्वरुपाचेही परवाने असतात. मद्यपींकडे परवाना नसेल तर गुन्हा दाखल होऊ शकतो.त्यामुळे कारवाई टाळण्यासाठी उत्पादन शुल्क विभागाकडून परवाने दिले जाते.

त्यानुसार, येत्या 31 डिसेंबरच्या पार्श्‍वभूमीवर आत्तापर्यंत ७ लाख तळीरामांनी मद्यपानाचे परवाने घेतले आहेत. यामध्ये देशी दारुसाठीचे ५ लाख २० हजार तर, विदेशी मद्यासाठीचे २ लाख २० हजार असे ७ लाख ४० हजार मद्यपींनी परवाने ऑनलाईन घेतले आहेत. मद्यविक्रेते व परमिट बारमध्येही एक-दोन दिवसांचे परवाने मद्यपींना उपलब्ध होणार आहेत.

अवैध मद्यवाहतूक रोखण्यासाठी त्र्यंबकेश्‍वर, आंबोली, हरसुल, राजबारी (पेठ), बोरगाव (सुरगाणा) याठिकाणी 24 तास नाकाबंदी करण्यात आली आहे. त्यासाठी विशेष पथकांची नियुक्ती करण्यात आली असून अवैधमद्याचे स्पॉटसह असे मद्य बनविणाऱ्यांवर कारवाई केली जात आहे.

हेही वाचा : जोखीममुक्त व्यवहारांसाठी रिझर्व बँकेचा 'डिजिटल रुपया'

पहाटेपर्यंत रंगणार पार्ट्या

३१ डिसेंबरसाठी मद्यविक्री करणाऱ्या शॉपी-मद्यपानासाठी परमीटरुम पहाटे पाचपर्यंत सुरू राहू शकतील. त्याचप्रमाणे यंदा प्रथमच वाईन-बिअर शॉपीलाही पहाटे पाचपर्यंत खुले ठेवता येणार आहे. त्यांना मद्यविक्री करता येणार आहे. देशीदारूच्या दुकानांसाठीही पहाटे पाचपर्यंतची वेळ निर्धारित केली आहे.

"नववर्षाचे स्वागत आनंदात-जल्लोषात जरूर करावे. परंतु मद्यपानाचा परवाना घेऊन त्यानंतरच मद्यपान करावे, पार्ट्या कराव्यात. तसे न करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करून गुन्हा दाखल होऊ शकतो."- शशिकांत गर्जे, अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क विभाग.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolhapur Circuit Bench : मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर खंडपीठासाठी 75 एकर जागेचा मार्ग मोकळा! निवृत्त सरन्यायाधीशांच्या उपस्थितीत कार्यक्रम; 16 ऑगस्टला होणार मोठी घोषणा?

लावणीच्या नावावर अश्लीलतेला लगाम! सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी घ्यावं लागेल प्रमाणपत्र, त्यानंतरच परवानगी; सरकारचा मोठा निर्णय

कार उलटल्यानंतर ट्रकला धडकली, चौघांचा जागीच मृत्यू; देवदर्शनाला निघालेल्या कुटुंबावर काळाचा घाला, ५ जण गंभीर

Shravan Belpatra Rules: बेलाचं पान कधी तोडावं? कधी तोडू नये? 'या' चुकांमुळे लागू शकतो दोष; जाणून घ्या योग्य नियम

Independence Day Live Update : बावनकुळेंचे स्वातंत्र्यदिनी विकसित महाराष्ट्राचे आवाहन

SCROLL FOR NEXT