fight with corona e-sakal
नाशिक

दिलासादायक! नाशिक जिल्ह्यात 7 हजार 518 रुग्णांची कोरोनावर मात

ॲक्‍टिव्‍ह रुग्‍ण संख्येत पाच हजार 276 ने घट झाली असून सद्यःस्‍थितीत जिल्‍ह्‍यात वीस हजार 693 बाधितांवर सध्या उपचार सुरु आहेत.

अरुण मलानी

नाशिक : जिल्‍ह्यात सलग तिसऱ्या दिवशी ॲक्‍टिव्‍ह रुग्‍ण (Active patients) संख्येत मोठी घट झाली आहे. कोरोनामुक्‍त (corona free) झालेल्‍या रुग्‍णांच्‍या तुलनेत नव्‍याने आढळलेल्‍या कोरोना बाधितांच्‍या (covid positive) संख्येत तफावत असल्‍याने ॲक्‍टिव्‍ह रुग्‍ण संख्याही घटली आहे. गुरुवारी (ता.13) दिवसभरात दोन हजार 276 रुग्‍णांचे अहवाल पॉझिटिव्‍ह आले. तर सात हजार 518 रुग्‍णांनी कोरोनावर मात केली. 34 बाधितांचा कोरोनाने बळी घेतला. यातून ॲक्‍टिव्‍ह रुग्‍ण संख्येत पाच हजार 276 ने घट झाली असून सद्यःस्‍थितीत जिल्‍ह्यात वीस हजार 693 बाधितांवर सध्या उपचार सुरु आहेत. (7 thousand 518 patients were cured in Nashik district today)

जिल्‍ह्‍यात ॲक्‍टिव्‍ह रुग्‍णांत घट

गुरुवारी कोरोनामुक्तांमध्ये नाशिक ग्रामीणमधील सर्वाधिक तीन हजार 758 रुग्‍णांचा समावेश होता. नाशिक शहरातील तीन हजार 498, नाशिक ग्रामीणमधील 162, तर जिल्‍हा बाहेरील शंभर रुग्‍णांनी कोरोनावर यशस्‍वीरीत्‍या मात केली. नव्‍याने आढळलेल्‍या कोरोना बाधितांमध्ये नाशिक ग्रामीणमधील एक हजार 268, नाशिक महापालिका क्षेत्रातील 999, मालेगावच्‍या नऊ रुग्‍णांचा अहवाल पॉझिटिव्‍ह आला आहे. सायंकाळी उशीरापर्यंत सहा हजार 343 रुग्‍णांचे अहवाल प्रलंबित होते. यापैकी चार हजार 183 अहवाल नाशिक ग्रामीण भागातील रुग्‍णांचे आहेत. तर नाशिक शहरातील एक हजार 796, मालेगावच्‍या 358 रुग्‍णांना अहवालाची प्रतिक्षा होती. जिल्‍हाभरातील रुग्‍णालये व गृहविलगीकरणात दोन हजार 559 रुग्‍ण दाखल झाले. यात जिल्‍हा रुग्‍णालयात पंधरा, डॉ.वसंत पवार वैद्यकीय महाविद्यालयात नऊ रुग्‍ण दाखल झाले. नाशिक ग्रामीणमधील 223, मालेगाव क्षेत्रातील 34 रुग्‍णांचा समावेश होता.

निफाड, मालेगाव तालुक्‍यातील प्रत्‍येकी पाच बाधितांचा मृत्‍यू

गुरुवारी झालेल्‍या 34 मृतांमध्ये नाशिक शहरातील बारा, नाशिक ग्रामीणमधील वीस तर मालेगाव महापालिका क्षेत्रातील दोन मृतांचा समावेश होता. नाशिक ग्रामीणमध्ये मालेगाव महापालिका क्षेत्राला लागून असलेला मालेगाव तालुक्‍यात तसेच निफाड तालुक्‍यात प्रत्‍येकी पाच बाधितांचा कोरोनाने बळी घेतला. कळवण, सिन्नर, तालुक्‍यातील प्रत्‍येकी दोन तर देवळा, बागलाण, पेठ, नाशिक तालुक्‍यातील प्रत्‍येकी एकाचा समावेश आहे.

शहरात आत्तापर्यंत दोन लाख कोरोनामुक्‍त

नाशिक महापालिका हद्दीत आत्तापर्यंत दोन लाख 14 हजार 095 पॉझिटिव्‍ह आढळून आले आहेत. कोरोनामुक्‍त झालेल्‍या रुग्‍ण संख्येनेही दोन लाखांचा आकडा ओलांडला आहे. आत्तापर्यंत दोन लाख 01 हजार 653 रुग्‍णांनी कोरोनावर यशस्‍वीरीत्‍या मात केली आहे. सध्या दहा हजार 0733 बाधितांवर सध्या उपचार सुरु आहेत.

(7 thousand 518 patients were cured in Nashik district today)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan Semi Final Scenario: पाकिस्तान 'उपकारा'वर जगणार, एका जागेसाठी तिघांमध्ये स्पर्धा रंगणार! जाणून घ्या मजेशीर समीकरण

Pune Metro : हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रो एप्रिलअखेर धावण्याची शक्यता, पण स्थानकांची कामे अपूर्णच

अल्पवयीन मुलाच्या हाती वाहन, वडिलास भरावा लागेल १०,००० दंड! सोलापूर शहरात बेशिस्त वाहनचालकांवर ‘सिग्नल’च्या ठिकाणी पण कारवाई; १४ मार्चला लोकअदालत

President Droupadi Murmu Shegaon Visit : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे शेगावात होणार आगमन; तीन हजार पोलिसांचा तगडा बंदोबस्त तैनात

PAK vs ENG, T20 WC: हॅरी ब्रूकचे विश्वविक्रमी शतक, इंग्लंड उपांत्य फेरीत! पाकिस्तान वर्ल्ड कप स्पर्धेतून बाहेर? पाकड्यांची रडारड...

SCROLL FOR NEXT