Malegaon Municipal Corporation latest marathi news
Malegaon Municipal Corporation latest marathi news esakal
नाशिक

Nashik News : मालेगाव महापालिकेची 70 टक्के कर वसुली; कर वसुलीचे प्रशासनासमोर मोठे आव्हान

प्रमोद सावंत

Nashik News : प्रशासनाला घरपट्टी, पाणीपट्टीसह मालमत्ता करापोटी मागील थकबाकी व आर्थिक वर्षातील मागणीसह सुमारे ४७ कोटी १६ लाख ८२ हजार ४६२ रुपये वसुलीचे उद्दिष्ट आहे. मार्चच्या अंतिम टप्प्याअखेर मनपा प्रशासनाने घरपट्टी, पाणीपट्टीपोटी ३२ कोटी ९९ लाख ७७ हजार ७२० रुपये वसुली केली आहे.

वसुलीचे हे प्रमाण ६९.९६ टक्के असून प्रशासनाला अद्याप थकबाकीपोटी असलेली १४ कोटी १७ लाख ४ हजार ७४२ रुपये वसुली करावयाची असून कर वसुलीसाठी सर्वंकष प्रयत्नांची गरज आहे. (70 percent tax collection of Malegaon Municipal Corporation Tax collection big challenge before administration Nashik News)

महानगरपालिका कार्यक्षेत्रात एक लाख २० हजार ९५७ मिळकती आहेत. मिळकतीच्या प्रमाणात अवघ्या ६१ हजार ८९३ नळजोडण्या आहेत. शहरातील मालमत्ता धारकांनी घरपट्टी समाधानकारकरीत्या भरली आहे.

यासाठी मनपा प्रशासनाने वसुलीसाठी नळजोडणी खंडित करणे, मालमत्ता सील करणे अशी मोहीम राबविली. यामुळे सुमारे ७० टक्के वसुली झाली असून आता प्रशासनासमोर शंभर टक्के थकबाकी वसुलीचे मोठे आव्हान आहे.

घरपट्टी वसुलीचे प्रमाण ८४.२४ टक्के असून पाणीपट्टी वसुलीचे प्रमाण मात्र अवघे ५६ टक्के आहे. मालेगाव महापालिकेचा पाणीपुरवठ्यावर होणारा खर्च अवाढव्य आहे. गिरणा धरणातील पंपिंगसाठी लाखो रुपये वीज बिलासाठी खर्च करावे लागतात. त्या तुलनेत पाणीपट्टी वसुलीचे प्रमाण कमी आहे. सरासरी वसुलीचे प्रमाण ६९.९६ टक्के आहे.

प्रशासनाला मागील थकबाकीसह चालू मागणी लक्षात घेता घरपट्टी पोटी २३ कोटी ३२ लाख ८९ हजार २५३ रुपये वसुल करावयाचे होते. यात मागील थकबाकी १० कोटी ८० लाख ६६ हजार ३६५ रुपये होती. या आर्थिक वर्षातील थकबाकी १२ कोटी ५२ लाख २२ हजार ८८८ रुपये आहे.

घरपट्टीची एकत्रित वसुली १९ कोटी ६५ लाख २६ हजार ७५५ इतकी झाली. ३ कोटी ६७ लाख ६२ हजार ४९८ रुपये थकबाकी आहेत. उर्वरित आठवड्याच्या कालावधीत जोमाने वसुली होईल असे आयुक्त भालचंद्र गोसावी, घरपट्टी अधिक्षक श्‍याम बुरकुल यांनी सांगितले.

हेही वाचा : जीएसटीसाठी नोंदणी केलीच नाही तर??

पाणीपट्टीपोटी १० कोटीची थकबाकी

पाणीपट्टीचे एकत्रित २३ कोटी ८३ लाख ९३ हजार २०९ रुपये वसुल करावयाचे होते. यात मागील थकबाकी १० कोटी ७३ लाख ८४ हजार ५७० रुपये होती. या आर्थिक वर्षातील थकबाकी १३ कोटी १०

लाख ८ हजार ६३९ रुपये आहे. पाणीपट्टीची एकत्रित वसुली १३ कोटी ३४ लाख ५० हजार ९६५ रुपये झाली. १० कोटी ४९ लाख ४२ हजार २४४ रुपये अद्याप थकीत आहेत. पाणीपट्टी वसुलीचे प्रमाण सुमारे ५६ टक्के असून पाणीपट्टी वसुली प्रशासनासाठी डोकेदुखी ठरत आहे.

प्रभाग १ आघाडीवर

महानगरपालिकेचे चार प्रभाग असून शहरातील कॅम्प-संगमेश्‍वर हा प्रभाग क्रमांक १ सर्वच बाबतीत आघाडीवर आहे. या प्रभागात सर्वाधिक ३७ हजार ७७४ मिळकत आहेत. सर्वाधिक २२ हजार ४६८ नळजोडण्या आहेत.

या प्रभागाची घरपट्टी व पाणीपट्टी वसुली सर्वाधिक आहे. प्रभाग १ मध्ये घरपट्टी व पाणीपट्टी कराची थकबाकीसह एकूण मागणी १६ कोटी १८ लाख ४६ हजार ५६६ रुपये होती. प्रभागातून १३ कोटी ६६ लाख ८२ हजार ९८४ रुपये वसुली झाली.

वसुलीचे हे प्रमाण सुमारे ८५ टक्के आहे. रमजान पर्व व एनजेटीच्या कारवाईमुळे काही प्लॅस्टिक कारखाने सील असल्याने कर वसुलीत व्यत्यय आल्याचे श्री. बुरकुल यांनी सांगितले

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pat Cummins SRH vs RR : डेथ ओव्हरमध्ये कमिन्सचा टेरर! रजवाड्यांची कडवी झुंज मोडून काढत हैदराबादचा नवाबी थाटात विजय

Sharad Pawar on Baramati: बारामती लोकसभेचा निकाल कसा दिसतो? शरद पवार म्हणतात, आजपर्यंत...

Hemant Savara: पालघरचा तिढा अखेर सुटला! हेमंत सावरांना महायुतीकडून उमेदवारी जाहीर

SRH vs RR IPL 2024 : शेवटच्या चेंडूवर भूवीने हैदराबादला मिळवून दिला विजय

Udayanraje Bhosale : साताऱ्यातून उमेदवारी जाहीर करायला भाजपला इतका वेळ का लागला? उदयनराजे भोसलेंनी स्पष्टच सांगितलं; पाहा Exclusive Interview

SCROLL FOR NEXT