NMC Abhay Yojana esakal
नाशिक

Abhay Yojana: अभय योजनेंतर्गत 785 नळजोडणी अधिकृत; अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्याने कारवाई

सकाळ वृत्तसेवा

Abhay Yojana : पाणीगळती व चोरी रोखण्यासाठी महापालिकेकडून जाहीर करण्यात आलेल्या अभय योजनेअंतर्गत ७८५ नळजोडणी नियमित करण्यात आल्या आहेत. महापालिकेला जवळपास दहा हजार नळजोडणी नियमित होतील, अशी अपेक्षा होती. मात्र अभय योजनेला अपेक्षित प्रतिसाद मिळाला नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

त्यामुळे आता विविध कर विभागाकडून अनधिकृत नळजोडणीधारकांवर कारवाई केली जाणार आहे. (785 taps authorized under Abhay Yojana Action for failure to receive expected response nashik)

नाशिक महापालिकेला जीएसटी व घरपट्टी पाठोपाठ पाणीपट्टीतून महसूल प्राप्त होतो. मात्र पाणीपट्टीतून प्राप्त होणारा महसूल उद्दिष्टापेक्षा फारच कमी आहे. यातून पाणीपुरवठा योजनेवर होणारा खर्चदेखील वसूल होत नाही.

किमान ना- नफा व ना- तोटा तत्त्वावर का होईना पाणीपुरवठा योजना चालविण्याची महापालिकेची धडपड आहे. घरपट्टी वसूल करण्यासाठी महापालिकेकडून आर्थिक वर्षाच्या पहिल्या तीन महिन्यात सवलत योजना लागू केली आहे.

या वर्षी जवळपास ९१ कोटी रुपयांचा महसूल मिळाल्याने त्याच धर्तीवर घरपट्टी वसूल करण्याबरोबरच पाणीगळती रोखण्यासाठी अभय योजना जाहीर केली. त्या योजनेअंतर्गत आत्तापर्यंत ८७१ अर्ज प्राप्त झाले.

त्यातील ७८५ नळजोडणी नियमित करण्यात आल्या. त्यातून १६ लाख ६२ हजार रुपयांचे दंडात्मक शुल्क आकारण्यात आले आहे.

अपेक्षित वसुली करण्यासाठी आता घरपट्टी व पाणीपट्टी देयक वाटपाचे खाजगीकरण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्या माध्यमातून अनधिकृत नळजोडणी शोधल्या जाणार आहेत.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

अनधिकृत नळजोडणीचे नियमितीकरण

विभाग नियमितीकरण

पूर्व ३०६

पश्चिम ४७

पंचवटी १७५

नाशिक रोड १८०

सातपूर ७२

सिडको ०५

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tirupati Laddu Controversy: ''तिरुपती प्रसादम लाडूत बाथरूम क्लिनर केमिकल्सयुक्त तुपाचा वापर झाला होता'' ; चंद्राबाबू नायडूंचा मोठा दावा!

Gold And Silver Rate: सोने-चांदीसाठी ‘सुवर्णकाळ’? दरांबाबत बाबा वांगांचा धक्कादायक अंदाज; नेमका काय दावा केला?

Latest Marathi News Live Update : मुलुंडमध्ये दिसला बिबट्या, लोकांमध्ये भीती

Sharad Pawar: मुंबई महापालिकेत पवारांचा वेगळाच गेम! एकमेव नगरसेवकाची साथ भलत्याच पक्षाला?

FASTag Annual Pass : अवघ्या सहा महिन्यांत तब्बल ५० लाख जणांनी खरेदी केले ‘फास्टॅग’ वार्षिक पास!

SCROLL FOR NEXT