senior citizen esakal
नाशिक

20 स्कोअर असतानाही 80 वर्षांचे आजोबा ठणठणीत!

संतोष विंचू

येवला (जि.नाशिक) : जगण्याची उमेद, योग्य आहार अन् मनाची तयारी असेल तर काहीही शक्य आहे. येथील उपजिल्हा रुग्णालयात कोरोना उपचारासाठी (corona virus) दाखल असलेल्या ८० वर्षीय आजोबांनी (senior citizen) हे दाखवून दिले आहे. एचआरसीटीचा (hrct score) स्कोअर २० असताना त्यांनी दुर्दम्य इच्छाशक्तीच्या बळावर कोरोनावर विजय मिळविला आहे. (80-year-old-grandfather-fight-Corona-strength-marathi-news)

८० वर्षीय आजोबांनी दाखवून दिले...

श्वास घेण्यास त्रास जाणवू लागल्याने डॉक्टरांच्या सल्ल्याने तपासणी केली असता तालुक्यातील जळगाव नेऊर येथील शेतकरी लक्ष्मण शिंदे यांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला. एचआरसीटी स्कोअर २० आल्याने नातेवाइकांनी तातडीने विविध खासगी रुग्णालयांत उपचारासाठी दाखल करण्याचे प्रयत्न केले. रुग्णसंख्या अधिक असल्याने त्यांना ऑक्सिजन मिळू शकला नाही. सर्व ठिकाणी नकारघंटा मिळाल्यावर अन् डॉक्टरांनीही सांगितल्याने शिंदे यांनी मनाशी खूणगाठ बांधत सरकारी दवाखान्यात उपचार घेण्याचे ठरविले.

सर्वतोपरी प्रयत्न करत औषधोपचार

त्यांना येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. या वेळी वैद्यकीय अधीक्षक डॉ. शैलजा कुप्पास्वामी, वैद्यकीय अधिकारी डॉ. पंकज पाटील व त्यांच्या सहकाऱ्यांनी सर्वतोपरी प्रयत्न करत औषधोपचार करून त्यांची प्रकृती बरी करण्यात यश मिळविले. औषधोपचार करताना रेमडेसिव्हिरसारख्या कोणत्याही इंजेक्शनचा वापर करावा लागला नाही हे विशेष.

स्कोअर २० असल्याने खासगी डॉक्टरांनी शासकीय रुग्णालयात जाण्याचा सल्ला दिला. प्रबळ इच्छाशक्तीच्या जोरावर, मनाशी घट्ट आशा बाळगून कोणताही विचार न करता मी आजाराला सामोरे जाण्याचा निश्चय केला. नियमित व्यायाम, योग्य आहार व येथील डॉक्टरांनी घेतलेल्या मेहनतीमुळे कोरोनावर मात केली.

-लक्ष्मण शिंदे, जळगाव नेऊर

शिंदे बाबा उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी आले त्या वेळी त्यांच्या मनाची बरे होण्याची तयारी आणि आमचे शर्थीचे उपचार यामुळे त्यांनी कोरोनावर मात केली. उपजिल्हा रुग्णालयातील सर्व टीम रुग्णांसाठी शर्थीचे प्रयत्न करत उपचार करत आहे. आतापर्यंत शिंदेंसारखे अनेक रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत.

-डॉ. पंकज पाटील, वैद्यकीय अधिकारी, येवला

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ram Mandir Trust: राम मंदिर प्रकरणात शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांच्यावर गंभीर आरोप; 'एसआयटी'कडे तक्रार

IND vs IRE, 2nd T20I: वैभव सूर्यवंशीचं पदार्पण, पण कोणाला डच्चू - सॅमसन, ईशान की अभिषेक? पाहा कशी असू शकते भारताची Playing XI

बाईकस्वारावर झाडाची फांदी कोसळली, थेट कोमात; रस्त्यातच घडला भीषण प्रकार, पाहा VIDEO

Monsoon Hair Care: पावसाळ्यात केसांची काळजी घेताना 'या' चुका टाळा; नाही तर केस आणि टाळूचं होऊ शकतं मोठं नुकसान

Latest Marathi News Live Update : TET परीक्षा पारदर्शक पद्धतीने घेण्यात येईल- पंकज भोयर

SCROLL FOR NEXT