Crowd of citizens to file applications in the market committee premises in Nampur. esakal
नाशिक

Nashik News: नामपूर बाजार समितीसाठी 9 अर्ज दाखल; 127 अर्जांची विक्री

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : येथील बाजार समितीच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी तिसऱ्या दिवशी सोसायटी, ग्रामपंचायत गटांसाठी १२७ अर्जांची विक्री झाली असून, नऊ उमेदवारांनी अर्ज दाखल केले.

निवडणूक निर्णय अधिकारी, सटाणा येथील सहाय्यक निबंधक जितेंद्र शेळके, मालेगाव येथील सहाय्यक निबंधक स्वप्नील मोरे यांनी ही माहिती दिली. (9 applications filed for Nampur Bazaar Committee 127 Sale of Applications Nashik News)

इच्छुकांनी नामांकनपत्रे खरेदी केली असली तरी अर्ज दाखल करण्यासाठी ‘वेट ॲन्ड वॉच’ सुरू आहे. पॅनलमध्ये उमेदवारी मिळावी, यासाठी इच्छुकांची व्यूहरचना सुरू असून, शेकडो उमेदवार रिंगणात उतरण्याची शक्यता आहे.

उच्च न्यायालयाच्या हस्तक्षेपानंतर सहकार प्राधिकरणाच्या जिल्हा निवडणूक अधिकारी यांनी नामपूर बाजार समितीचा निवडणूक कार्यक्रम नुकताच जाहीर केला.

विद्यमान संचालक मंडळाने निवडणुकीच्या निर्णयाविरोधात उच्च न्यायालयात दाद मागितली आहे. त्यामुळे निवडणूक होणार की नाही, अशी संभ्रमावस्था काही इच्छुक उमेदवारांमध्ये पाहायला मिळत आहे.

गुरुवारी (ता. ७) सामाजिक कार्यकर्ते आकाश भामरे, सतीश खैरनार, प्राथमिक शिक्षक संघाचे नेते नंदकुमार गायकवाड, अमृत खैरनार, चारू खैरनार, यांनी सोसायटी गटातून, तर शशी कोर यांनी ग्रामपंचायत गटातून उमेदवारी अर्ज दाखल केला.

निवडणूक कार्यक्रम घोषित झाल्याने पॅनलप्रमुख, इच्छुक उमेदवार, समर्थक यांच्या गावनिहाय बैठका सुरू असून उमेदवारसाठी इच्छुकांमध्ये रस्सीखेच सुरू आहे. इच्छुकांच्या भाऊगर्दीमुळे यंदाची निवडणूक चुरशीची होणार आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

दरम्यान, दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर नामपूर बाजार समितीची निवडणूक रद्द करावी, अशी मागणी शेतकरी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष शैलेंद्र कापडणीस यांनी केली आहे.

बाजार समिती निवडणुकीमुळे तालुक्यातील राजकीय हालचाली गतिमान झाल्या असून, यंदाची निवडणूक अत्यंत चुरशीची होण्याची शक्यता राजकीय वर्तुळात वर्तवली जात आहे. उमेदवारी अर्ज खरेदी करण्यासाठी पुढारी, समर्थकांच्या गर्दीने बाजार समितीचे आवार फुलून गेले होते.

महाविकास अघाडीतर्फे स्वतंत्र पॅनल

नामपूर बाजार समितीच्या निवडणुकीत महाविकास आघाडीतर्फे स्वतंत्र पॅनल उभारण्यात येणार असून, शेतकऱ्यांच्या हितासाठी लढणाऱ्या नवीन चेहऱ्यांना संधी देणार असल्याचे बागलाणचे माजी आमदार संजय चव्हाण यांनी ‘सकाळ’ला सांगितले.

विधानसभा निवडणुकीची रंगीत तालीम म्हणून नामपूर बाजार समितीच्या निवडणुकीकडे पाहिले जाते. त्यामुळे आमदार दिलीप बोरसे, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य यतीन पगार, कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे उत्तर महाराष्ट्रप्रमुख अभिमन पगार यांच्या नेतृत्वाखालील पॅनलची निर्मिती होणार असून, इच्छुक उमेदवारांचा दोन्ही पॅनलकडून शोध सुरू आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ramdas kadam : रामदास कदम यांचा आणखी एक खळबळजनक दावा, थेट उद्धव ठाकरेंना आव्हान

Crime News : गोळीबार प्रकरण: पंचवटी पोलिसांकडून १४वा संशयित जेरबंद, आतापर्यंत माजी नगरसेवकासह १४ अटकेत

World Cup 2025: भारताविरुद्ध पाकिस्तानने टॉस जिंकला, प्लेइंग इलेव्हनमध्ये बदल; हस्तांदोलन झालं की नाही?

Sangli Accident Death : काम संपवून घरी निघाला होता, समोरू दुचाकी आली अन् दोघेही जाग्यावर संपले; सांगलीतील घटना

Latest Marathi News Live Update:परबांनी बिल्डरांकडून मर्सिडीज घेतली की नाही, नार्को टेस्टही हवी : रामदास कदम

SCROLL FOR NEXT