ZP school esakal
नाशिक

SAKAL Special: जिल्ह्यात 9 समूह शाळा प्रस्तावित! कमी पटसंख्येच्या 33 ZP शाळांचे होणार एकत्रीकरण

स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता विकासासाठी शालेय शिक्षण विभागाने समूह शाळा योजना प्रस्तावित केली आहे.

प्रशांत बैरागी

नामपूर : स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता विकासासाठी शालेय शिक्षण विभागाने समूह शाळा योजना प्रस्तावित केली आहे.

या योजनेला शिक्षक संघटनांसह शैक्षणिक वर्तुळात विरोध होत असला तरी शिक्षण विभाग आपल्या निर्णयावर कायम असल्याने जिल्हा परिषदेने जिल्ह्यातील नऊ शाळांचा समूहशाळेसाठी शिक्षण आयुक्त कार्यालयास प्रस्ताव पाठवला आहे. कमी पटसंख्येसह एकाच आवारात भरणाऱ्या ३३ जिल्हा परिषदेच्या शाळांचे समूहशाळेत आगामी काळात रूपांतर होणार आहे. (9 group schools proposed in district Consolidation of 33 ZP schools with low enrollment Nashik News)

राज्यातील शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांनी आपल्या कार्यक्षेत्रातील छोट्या शाळांचा विशेषतः आदर्श शाळांचा कमी पटाच्या शाळा जोडण्यासाठी प्रक्रिया सुरू करावी असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत देण्यात आले होते.

गुणवत्तेच्या दृष्टिकोनातून विद्यार्थ्यांना पुरेशा प्रमाणात शैक्षणिक सुविधा मिळाव्यात व त्यांच्यामध्ये शिक्षणातील विविध अध्ययन क्षमता विकसित होण्यास वाव मिळावा हा यामागील प्रमुख उद्देश आहे.

या प्रस्तावाचे अवलोकन करून शिक्षणाधिकारी (प्राथमिक) यांनी आपल्या जिल्ह्यातील कमी पटाच्या सर्व शाळांचा विचार करून त्यापैकी शाळांचे एकत्रीकरण करून समूह शाळा तयार करण्यासंदर्भात प्रस्ताव तयार करण्याच्या सूचना प्राथमिक शिक्षणाधिकारी यांना देण्यात आल्या होत्या.

शाळेतील प्रत्येक विद्यार्थ्याचे सामाजिकीकरण होण्यासाठी, त्याच्यामध्ये खेळाडू वृत्ती निर्माण होण्यासाठी, गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळण्यासाठी अनेक साधनसामग्रीची गरज असते. कमी पटसंख्येच्या शाळांना मात्र मर्यादा असतात. दृक-श्राव्य साधने, क्रीडांगण, खेळांची मैदाने व पुरेशा प्रमाणात शिक्षक सोबत असणे आवश्यक आहे.

कमी पटाच्या शाळांमध्ये या सर्व बाबींची अनुपलब्धता असल्याने याचा गुणवत्तापूर्ण शिक्षणावर व विद्यार्थ्यांच्या सर्वांगिण विकासावर प्रतिकूल परिणाम होताना दिसत आहे, अशी शिक्षण विभागाची भूमिका आहे.

जिल्हा परिषदेने सर्वेक्षण करून विहित नमुन्यात वरिष्ठ कार्यालयास समूहशाळेच्या निर्मितीबाबतची माहिती सादर केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Monsoon Rain : राज्यात पावसाचा कहर ! मुसळधार पावसाने मुंबई ठप्प, पुण्यात जनजीवन विस्कळीत; मध्य महाराष्ट्र-विदर्भात अलर्ट जारी

Pune Crime: 'Sorry Mummy' मेसेजनंतर खळबळ! 'ज्युस घेऊन येते' म्हणत घराबाहेर पडलेली अल्पवयीन बेपत्ता; चुलत भावावर गुन्हा

Konkan Nuclear project: कोकणात अणुऊर्जा प्रकल्पाचे संकेत! राज्य सरकारचे विधानसभेत स्पष्टीकरण; नेमका प्रकल्प कुठे उभारणार?

Indian Army: देशसेवकाला अखेरचा सलाम! जवान तुषार भिलारेंच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; कुटुंबीयांचा आक्रोश काळजाला भिडणारा

Latest Marathi News Live Update : मुसळधार पावसाचा कहर, सायन-पनवेल हायवे जलमय

SCROLL FOR NEXT