plating industries Google
नाशिक

नाशिक : पालकमंत्र्यांच्या बैठकीनंतर नऊ प्लेटिंग उद्योग ‘रिस्टार्ट’

सतिष निकूंभ

सातपूर (नाशिक) : गेल्या आठवड्यात हरीत न्यायालयाच्या आदेशाचे पालन करत अंबड औद्योगीक वसाहतीतील पंधरा प्लेटिंग उद्योगांवर एमपीसीबीने कारवाईचा बडगा उगारला होता. याबाबत उद्योग संघटनांनी पालकमंत्री छगन भुजबळ यांच्याकडे कैफियत मांडत तोडगा काढण्याची मागणी केली होती. त्यानुसार झालेल्या बैठकीनंतर मंगळवारी (ता. ३) मंत्रालय स्तरावरून या पंधरापैकी नऊ प्लेटिंग उद्योग रिस्टार्ट करण्यात आल्याचे समजते.

नाशिकच्या सिएटीपी प्रकल्पाच्या संदर्भात प्लेटिंग उद्योग संघटनेसह आयमाने निवेदन देवून, कारवाई न करण्याची मागणी केली होती. मात्र, उद्योगमंत्र्यांची पाठ फिरताच प्लेटिंग उद्योगावर एमपीसीबीने कारवाईचा बडगा उगारला होता. यामुळे शेकडो उद्योजक उद्योग भवनात येवून संतप्त भावना व्यक्त करताना पाहायला मिळाले होते. याबाबत संघटनेचे पदाधिकारी मंत्रालयातही गेले होते.

त्यानंतर सोमवारी प्लेटिंग उद्योग संघटना व आयमाच्या शिष्टमंडळाने पालकमंत्री भुजबळ यांना साकडे घातले. त्यानंतर एमपीसीबी, एमआयडीसी आदींच्या आधिकाऱ्यांसह बैठक घेऊन, कंपनी अंतर्गत सुधारणांची पाहणी करून, मंत्रालय स्तरावरून नऊ प्लेटिंग उद्योग पुन्हा सुरू करण्यात आल्याचे सुत्रांनी सांगितले. यामुळे तात्पुरता दिलासा मिळाला असला, तरी टांगती तलवार मात्र कायम असल्याची भीती उद्योजकांनी व्यक्त केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

नवले ब्रिजवरील वाहतूक ३ तासांनी सुरू; कोंडी सोडवण्यासाठी पोलिसांकडून बळाचा वापर, आंदोलकांमध्ये तीव्र नाराजी

Mumbai Indians Playoff Scenario: मुंबई इंडियन्सचे आव्हान संपुष्टात? आता काही केलं तरी प्ले ऑफमध्ये पोहोचणे अशक्य; हार्दिक पांड्याच्या नेतृत्वावर सवाल, CSK चं काय?

How Mumbai Indians Still Qualify for Playoff? हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली संघ नेमका कुठे कुठे चुकला? मुंबई इंडियन्सला १४ गुणांसह अव्वल चार मध्ये पोहोचता येईल का?

Dhamangaon Blaze: नागपूरमधील धामणगाव विद्यामंदिर गावात भीषण आग, ३०-४० घरे जळून खाक, लाखोंचे नुकसान

गोव्यात दारू प्यायल्यावर जास्त नशा का चढत नाही? ९९ टक्के लोकांना खरं कारण माहित नाही...

SCROLL FOR NEXT