Corona Updates Nashik sakal
नाशिक

नववर्षात पहिल्यांदाच शंभरापेक्षा कमी बाधित | Corona Updates

अरुण मलाणी

नाशिक : कोरोनाचा (Corona) प्रादुर्भाव घटत असल्याचे दिलासादायक चित्र जिल्ह्यात आहे. बुधवारी (ता. १६) नववर्षात पहिल्यांदाच दैनंदिन कोरोनाबाधितांची संख्या शंभरपेक्षा कमी म्हणजेच नव्वदीपर्यंत आली आहे. दरम्यान, जिल्ह्यात २०२ रुग्‍णांनी कोरोनावर यशस्‍वीरीत्‍या मात केली असून, एका बाधिताचा मृत्‍यू झाला. यामुळे ॲक्‍टिव्‍ह रुग्‍णसंख्येतही घट झाली आहे.

सद्यःस्‍थितीत जिल्ह्यात अकराशे बाधितांवर उपचार सुरू

नवीन वर्षाच्या सुरवातीला दैनंदिन कोरोनाबाधितांची संख्या तीनअंकी होती. हा आकडा वाढत जाऊन पुढे हजारांत पोचला होता. आता पुन्‍हा परिस्‍थिती नियंत्रणात येत असून, बुधवारी पॉझिटिव्ह अहवाल आलेल्या रुग्णांमध्ये नाशिक महापालिका क्षेत्रातील ६२, नाशिक ग्रामीण भागातील २३, जिल्‍हाबाहेरील पाच रुग्णांचा समावेश आहे. मालेगाव महापालिका क्षेत्रात दिवसभरात एकाही रुग्‍णाचा अहवाल पॉझिटिव्‍ह आला नाही. जिल्ह्यात एका बाधिताच्‍या मृत्‍यूची नोंद असून, तो नाशिक महापालिका क्षेत्रातील आहे.

ॲक्‍टिव्‍ह रुग्‍णांची स्‍थिती

सायंकाळी उशिरापर्यंत एक हजार २९२ रुग्‍णांचे अहवाल प्रलंबित होते. यात नाशिक ग्रामीणमधील सर्वाधिक एक हजार १२०, तर नाशिक शहरातील ७२ व मालेगावच्‍या शंभर रुग्‍णांना अहवालाची प्रतीक्षा होती. जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटी दर २.४२ टक्‍के राहिला. यात नाशिक शहराचा पॉझिटिव्हिटी दर ४.२२ टक्‍के व नाशिक ग्रामीणचा १.०७ टक्‍के होता.

नाशिक महापालिका क्षेत्र----------२००
नाशिक ग्रामीण क्षेत्र---------------९१२
मालेगाव महापालिका क्षेत्र--------१४
जिल्‍हाबाहेरील बाधित------------४१

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

Ranji Trophy: ८ चौकार अन् ३ षटकार... रिंकू सिंगचं खणखणीत नाबाद शतक; टीम इंडियात पुनरागमनासाठी ठोकली दावेदारी

IND vs WI: तिलक वर्माचा ब्रेनफेड मुमेंट... चौकार झाला असं वाटलं अन् झाला विचित्रपद्धतीने रन आऊट; पाहा Video

SCROLL FOR NEXT