corona updates corona updates
नाशिक

नाशिक जिल्‍ह्यात दिवसभरात ८९ कोरोनामुक्‍त, एक मृत्‍यू

अरुण मलाणी

नाशिक : जिल्‍ह्यात बऱ्याच दिवसांनंतर नव्‍याने आढळणाऱ्या कोरोना बाधितांची संख्या ही कोरोनामुक्‍त रुग्‍णांपेक्षा अधिक राहिली. गुरुवारी (ता.५) जिल्‍ह्यात ९७ रुग्‍णांचे अहवाल पॉझिटिव्‍ह आले. तर ८९ रुग्‍णांनी कोरोनावर मात केली. एका बाधिताचा उपचारादरम्‍यान मृत्‍यू झाला. सद्यःस्‍थितीत एक हजार ०५९ बाधितांवर उपचार सुरु आहेत.

गुरुवारी नाशिक महापालिका क्षेत्रात ३३, नाशिक ग्रामीणमध्ये ६२, जिल्‍हा बाहेरील दोन रुग्‍णांचे अहवाल पॉझिटिव्‍ह आले. मालेगाव महापालिका क्षेत्रात एकही बाधित आढळला नाही. जिल्‍ह्‍यात एका बाधिताच्‍या मृत्‍यूची नोंद असून, नाशिक ग्रामीण क्षेत्रातील हा मृत बाधित आहे.

सायंकाळी उशीरापर्यंत एक हजार ३९२ रुग्‍णांना अहवालाची प्रतिक्षा होती. नाशिक ग्रामीण क्षेत्रातील एक हजार ०४७, मालेगाव क्षेत्रातील २१९, नाशिक महापालिका क्षेत्रातील १२६ रुग्‍णांना अहवालाची प्रतिक्षा होती. जिल्‍हाभरातील रुग्‍णालये व गृहविलगीकरणात २१० रुग्‍ण दाखल झाले. यात नाशिक महापालिका क्षेत्रातील १७२ रुग्‍णांचा समावेश आहे. जिल्‍हा रुग्‍णालयात चार, डॉ.वसंत पवार वैद्यकीय महाविद्यालयात एक रुग्‍ण दाखल झाला. नाशिक ग्रामीण क्षेत्रातील ३३ रुग्‍णांचा समावेश होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT