Gangapur Dam esakal
नाशिक

Nashik Rain News : नाशिक जिल्ह्यात पावसाची उघडीप; गंगापूरमध्ये 97.10 टक्के साठा

सकाळ वृत्तसेवा

Nashik Rain News : पावसाळ्याचे तीन महिने पुरेसा पाऊस झालेला नाही; परंतु गेल्या दोन आठवड्यांत पावसाचा जोर वाढला आहे. शनिवारी (ता. २२) सायंकाळनंतर सुरू झालेला जोरदार पाऊस मध्यरात्रीपर्यंत सुरू होता.

यामुळे गंगापूर धरणातील साठा ९७.१० टक्क्यांवर पोहोचला आहे. पहाटेपर्यंत ३३ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. (97 percent water in Gangapur dam nashik news)

यंदा नाशिकसह राज्यातील बहुतांश जिल्ह्यांत पावसाअभावी दुष्काळसदृश परिस्थिती आहे. मात्र, दोन आठवड्यांपासून संततधार नसला तरी जोरदार पावसाची हजेरी लागत आहे. त्यामुळे गंगापूर धरणातील साठा ९७.१० टक्क्यांवर पोहोचला आहे.

शनिवारी सायंकाळी धुवांधार पावसाने हजेरी लावली. विशेषत: मध्यरात्रीपर्यंत पावसाची संततधार सुरू होती.

गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस झाल्याने पाणीपातळी वाढली.

धरणातून तीन हजार ३१८ क्यूसेस पाण्याचा विसर्ग करण्यात आला होता. दरम्यान, रविवारी (ता. २३) पावसाने उघडीप दिली. गंगापूर धरणातून करण्यात येणारा पाण्याचा विसर्ग थांबविण्यात आलेला आहे. रविवारी दिवसभर ढगाळ वातावरण मात्र कायम होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IAS Officer Scam Arrested : निवृत्तीच्या शेवटच्या दिवशी १६९ कोटींचा घोटाळा केल्याचे समजलं; आयएएस अधिकाऱ्याला CBI कडून अटक; ८ विभागात ५०४ कोटी लाटले?

Latest Marathi News Live Update : नेरूळमध्ये पावसात शॉर्टसर्किटचा धक्का; करंट लागून दोन महाविद्यालयीन विद्यार्थिनी जखमी

MPSC Mega Bharti : एमपीएससीकडून 2,619 जागांसाठी मोठी भरती! 'या' पदांसाठी होणार परीक्षा, ऑनलाईन अर्ज सुरू; सीमाभागातील उमेदवारांनाही संधी

Mumbai News: फेरीवाला परवान्यांवर न्यायालयाचे ताशेरे, एकाच कुटुंबाला अनेक परवाने; पालिकेला फटकारले

Luxury Bus Bike Accident : लक्झरी बसची दुचाकीला धडक; दोन तरुण ठार, बसचालक फरारी, पोलिसांकडून शोध सुरू

SCROLL FOR NEXT