नाशिक

जिल्ह्यातील ५९ हजार ५०० विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भविष्य टांगणीला :

CD
सकाळ विशेष ---------- पान-३ मुख्य अंक ---------- आधार अपडेटअभावी संचमान्यतेवर परिणाम जिल्ह्यात ५० हजारावर विद्यार्थी ः प्रशासकीय उदासिनता, कॅम्प घेण्याची मागणी विजय पगारे : सकाळ वृत्तसेवा इगतपुरी, ता. २ : जिल्ह्यात पंधरा तालुक्यातील विद्यार्थ्याच्या आधारकार्ड व्हॅलिडिटेशनबाबत वारंवार कळवूनही प्रशासनाच्या दिरंगाईमुळे ते होऊ शकलेले नाही. त्यामुळे अंतिम संचमान्यता करताना या भोंगळ कारभाराचा सर्व यंत्रणेला मनस्ताप सहन करावा लागत आहे. शिक्षण विभागाच्या आकडेवारीनुसार, सर्व प्राथमिक शाळेतील तब्बल ५० हजारावर विद्यार्थ्यांचे आधारसंदर्भातील काम प्रलंबित असल्याचे समोर आले आहे. प्राथमिक शिक्षण संचालनालयाने संचमान्यतेसाठी ''आधार वैध'' असणे सक्तीचे केले असताना, प्रशासकीय उदासीनतेमुळे या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य अधांतरी लटकले आहे. --------------- प्रत्येक तालुक्यात प्राथमिक शिक्षणासाठी स्वतंत्र आधार मशीन व अंगणवाडी (० ते ६ वयोगट) मुलांसाठी आधार मशीन उपलब्ध उपलब्ध करावीत अशी मागणी होत आहे. अनेक केंद्रांवर ऑपरेटर नसल्याने विद्यार्थी व पालकांना आधार अपडेटसाठी तालुक्यांपर्यंत हेलपाटे मारावे लागत आहेत. अनेक केंद्रांवर नियमानुसार दरपत्रके लावलेली नाहीत अशाही काही पालकांसह शिक्षकांच्या तक्रारी आहेत. शिक्षण संचालनालयाने सप्टेंबरअखेरपर्यंत ''आधार वैध'' विद्यार्थी संख्येच्या आधारे संचमान्यता करण्याचे स्पष्ट निर्देश दिले आहेत. आधार कार्ड अपडेट नसेल, तर विद्यार्थ्यांची नोंदणी ''वैध'' ठरणार नाही आणि पर्यायाने शाळेची संचमान्यता रोखली जाईल. यामुळे शाळांना शिक्षक मिळण्यात अडचणी येतील आणि त्याचा थेट फटका विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला बसेल. या दिरंगाईची सर्वस्वी जबाबदारी नक्की कुणाची? असा सज्जड इशारा शिक्षण संचालकांनी दिला असूनही प्रशासन मात्र ''जैसे थे'' परिस्थितीत आहे. -------------- मुख्याध्यापकांच्या मागण्या उपलब्ध मशिनचा प्रभावी वापर करून शाळास्तरावर विशेष आधार नोंदणी कॅम्प आयोजित करणे. जबाबदारी निश्चिती करुन संच मान्यतेच्या डेडलाईनपूर्वी आधार नोंदणी न झाल्यास, मुख्याध्यापक, गटशिक्षणाधिकारी व केंद्रप्रमुखांवर कारवाईची टांगती तलवार असेल. विद्यार्थ्यांचे भवितव्य सध्या प्रशासनाच्या ''आधार''वर अवलंबून आहे. आता तहसीलदार आणि शिक्षण विभाग या गंभीर प्रकरणाची दखल तातडीने घेतात की ? विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाल्यावरच जाग येणार याकडे संपूर्ण लक्ष लागले आहे. -------------- एक वर्षांपासून आम्ही आधार कार्डबाबत मागिती देत आहोत. तहसीलदारांनी अहवाल सादर करूनही कोणतीही सुधारणा झालेली नाही. जर तातडीने विशेष आधार कॅम्प लावून विद्यार्थ्यांचे आधार अपडेट बाबत काम पूर्ण केले नाही, तर संचमान्यतेला अडथळा येऊ शकतो. - जनार्दन केकरे, मुख्याध्यापक, कुरुंगवाडी ( ता.इगतपुरी ) -----------------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

विजय शंकरसह ३ भारतीय खेळाडू खेळणार Afghanistan Premier League? ड्राफ्टमध्ये २९ पाकिस्तानी अन् १० बांगलादेशी खेळाडूंचाही समावेश

'महाराजांचे गडकिल्ले, जंगलं आणि डोंगर धोक्यात'; सयाजी शिंदेंचा संतापले, सह्याद्री वाचवण्यासाठी सुरू केली मोठी चळवळ

Latest Marathi News Live Update : शरद पवार पुण्याच्या रुबी हॉल क्लिनिकमध्ये दाखल; सुप्रिया सुळेंनी दिली माहिती

''उमर अब्दुल्ला आणि निधी राजदान यांचा विवाह शरिया कायद्यानुसार बेकायदेशीर'', 'ऑल इंडिया मुस्लिम जमात'चा आक्षेप

Chhatrapati Shahaji Raje and Sambhaji Maharaj Samadhi Controversy : छत्रपती शहाजीराजे भोसले व थोरले संभाजी महाराज यांच्या समाधीस्थळी मेघडंबऱ्या उभारणाऱ्या महाराष्ट्रातील शिवप्रेमींवर कर्नाटक पोलिसांकडून गुन्हे दाखल

SCROLL FOR NEXT