नाशिक

पाटणची आशापुरी माता

CD
धार्मिक पर्यटन श्रद्धेच्या इतिहासाचा जागर ---------------------- पाटणची आशापुरी माता शिंदखेडा तालुक्यातील पाटण येथील श्री आशापुरी माता मंदिर हे परिसरातील भाविकांचे श्रद्धास्थान म्हणून ओळखले जाते. शेकडो वर्षांची धार्मिक परंपरा, मंदिराशी जोडलेल्या आख्यायिका, वैशिष्ट्यपूर्ण वास्तुरचना आणि विविध धार्मिक उत्सवांमुळे या मंदिराला वेगळे महत्त्व प्राप्त झाले आहे. नवरात्रोत्सव तसेच पौर्णिमा, अमावस्या, अष्टमी, मंगळवार,शुक्रवारच्या आणि रविवार या दिवशी मंदिरात भाविकांची विशेष गर्दी असते. - जितेंद्र मेखे, शिंदखेडा आख्यायिका आशापुरी मातेच्या मंदिराबाबत परिसरात एक प्रचलित आख्यायिका सांगितली जाते. राजस्थान येथील आशापुरी मातेचा एक भक्त वृद्धापकाळामुळे देवीच्या दर्शनासाठी राजस्थानला जाऊ शकत नव्हता. त्याने आपल्या भक्तीने देवीला आपल्या गावाजवळ येण्याची विनंती केली. देवीने त्याची विनंती मान्य करून त्याच्यासोबत येण्याचे सांगितले; मात्र मागे वळून पाहू नकोस, अशी अट घातली. भक्त पाटण परिसरात आल्यानंतर उत्सुकतेपोटी त्याने मागे वळून पाहिले. त्यानंतर देवी त्याच ठिकाणी स्थिरावली, अशी श्रद्धा आहे. याच ठिकाणी पुढे मंदिर उभारण्यात आल्याचे स्थानिकांकडून सांगितले जाते. मंदिराच्या प्राचीनतेबाबत स्थानिक परंपरेत विविध उल्लेख आढळतात. काही जाणकारांननुसार मंदिर सातशे वर्षांपूर्वीचे असल्याचे सांगितले जाते; इ.स. १८२८ मंदिराची उभारणी केली असल्याचे माहिती आहे. शिंदखेडा येथील रावळ राजघराण्याशी मंदिराचा संबंध असल्याचे सांगितले जाते. मंदिराला जमीन इनाम मिळाल्याची नोंदही करण्यात आली आहे. मंदिर परिसरात प्रवेशद्वार, नगारखाना, भक्तनिवास आणि प्राचीन वास्तूचे विविध घटक लक्ष वेधून घेतात. मंदिराच्या आवारातील दीपमाळ, पितळी सिंह, कासव, यज्ञकुंड तसेच उंच त्रिशूल हे भाविकांचे आकर्षण ठरतात. प्रवेशद्वाराजवळील नक्षीदार पाषाणातील शिवलिंगही मंदिराच्या परिसरातील वैशिष्ट्यपूर्ण ठेवा मानला जातो. मंदिराची रचना सभामंडप आणि गर्भगृह अशी असून, मंदिरातील संपूर्ण गाभारा तांब्याने मढविण्यात आला असून, भविष्यात त्यावर सुवर्ण पॉलिश करून संपूर्ण गाभारा सुवर्णमय करण्याची योजना आहे. नवरात्रात धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल चैत्र नवरात्र आणि शारदीय नवरात्रासह शाकंभरी नवरात्र, पौर्णिमा आणि इतर धार्मिक पर्वांच्या काळात मंदिरात विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. महाभिषेक, पूजा, भजन, कीर्तन, प्रवचन, जागरण, गोंधळ आणि महाप्रसाद आदी कार्यक्रमांमुळे मंदिर परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण होते. मंदिरात कसे पोहोचावे मंदिर हे शिंदखेडा तालुक्यात पाटण या गावी बुराई नदीच्या काठी वसलेले आहे. मंदिर हे शिंदखेडा, शिरपूर आणि धुळे महामार्गांवरून रस्त्यावर जोडलेले आहे. शिंदखेडा शहरापासून तीन किलोमीटर अंतरावर, शिरपूर शहरापासून २२ किलोमीटर तर धुळे येथून ५० किलोमीटर अंतरावर मंदिर आहे. बस किंवा खासगी वाहनाने येथे येता येते. भक्त निवासाची व्यवस्था लांबून येणाऱ्या भक्तांसाठी मंदिर ट्रस्टतर्फे येथे भक्त निवासाची व्यवस्था करण्यात आलेली आहे. मंदिर परिसरात एकूण ६५ खोल्यांचे तीन भक्तनिवास उभारण्यात आलेले आहे. खोल्यांमध्ये मुक्कामासाठी सुविधा उपलब्ध केली आहे. फोटो- १)तांब्याने मढविण्यात आलेला गाभारा व मूर्ती २) मंदिर परिसरातील दुमजली भक्तनिवास ३) मंदिराचे भव्य प्रवेशद्वार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ज्ञानेश कुमार यांची खुर्ची जाणार, तुरुंगवारीही ठरलेली! रामलीला मैदानातून राहुल गांधींचा थेट इशारा...

RINKU SINGH: ठरलं तर मग! रिंकू सिंहच्या लग्नाची तारीख पक्की, बहीण नेहा सिंहने दिली मोठी अपडेट; शॉपिंगही झाली सुरू, जाणून घ्या सविस्तर

बांदेकरांच्या सुनेची झी मराठीच्या नव्या मालिकेत एन्ट्री! हर्षद अतकरी साकारणार 'अभ्या', तारीख आणि वेळ जाहीर

थंडीच्या दिवसांत ओठ फुटतात, कोरडे पडतात? पारिजातकाच्या फुलांपासून बनवा नॅचरल लिप बाम; ओठ राहतील मऊ!

Latest Marathi News Update : "भाजप कधीही पुन्हा सत्तेत येणार नाही!" अखिलेश यादव यांचा दावा; उत्तर प्रदेशातील मतचोरीवरून भाजपवर गंभीर आरोप

SCROLL FOR NEXT