NSK26H35222
जळगाव : ईस्ट खान्देश एज्युकेशन सोसायटीच्या विशेष सर्वसाधारण सभेत उपस्थित अभिषेक लाठी. सोबत मुकुंद लाठी.
……………………..
शीर्षक
ईस्ट खान्देश एज्युकेशन सोसायटी
अध्यक्षपदी अभिषेक लाठी नियुक्त
उपशीर्षक
विशेष सभेत घोषणा; सचिवपदी मुकुंद लाठी
सकाळ वृत्तसेवा
जळगाव, ता.१७ : ईस्ट खान्देश एज्युकेशन सोसायटीच्या अध्यक्षपदी अभिषेक अविनाश लाठी यांची निवड करण्यात आली. संस्थेचे सचिव मुकुंद लाठी तसेच अन्य ज्येष्ठ सदस्यांच्या मार्गदर्शनाखाली नव्या कल्पना राबवून संस्थेचे नाव अधिक उज्ज्वल करणार असल्याचा मनोदय नवनियुक्त अध्यक्ष अभिषेक लाठी यांनी बोलून दाखवला.
ईस्ट खान्देश एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष अरविंद लाठी यांचे १९ जुलैला निधन झाल्याने उर्वरित कालावधीसाठी रिक्त पदावरील नियुक्तीसाठी संस्थेची विशेष सर्वसाधारण सभा बोलावण्यात आली होती. या सभेत सर्व सदस्यांत चर्चा होऊन वरिलप्रमाणे नियुक्ती करण्यात आली.
२००२ पासून अरविंद लाठी हे या संस्थेचे अध्यक्ष होते. याच काळापासून संस्थेच्या सचिवपदी मुकुंद लाठी हे कार्यरत आहेत. अरविंद लाठी यांच्यासह संस्थेच्या उभारणीत मुकुंद लाठी यांचे मोठे योगदान राहिलेले आहे. नूतन अध्यक्ष अभिषेक लाठी यांच्यासह येणाऱ्या कालावधीत शिक्षण व क्रीडा अशा दोन्ही क्षेत्रांत आर. आर. विद्यालय, आर. आर. कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालय, भा. का. लाठी विद्यामंदिर, न्यू इंग्लिश मीडियम स्कूलची कमान कशी उंच राहील, त्या दृष्टीने विविध योजना राबविणार असल्याचे मुकुंद लाठी यांनी सांगितले. मुकुंद लाठींसह ज्येष्ठ सदस्यांच्या मार्गदर्शनाखाली खो खो, कबड्डी, बास्केट बॉलसाठी मैदान सुसज्ज करण्यात येईल, असे नवनियुक्त अध्यक्ष अभिषेक लाठी म्हणाले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.