abhijit ahire.jpg 
नाशिक

पीएसआय म्हणून अनुसूचित जातीत राज्यात पहिला आलेला अभिजित म्हणतो..." स्मार्टफोन हे दुधारी शस्त्र!

हर्षल गांगुर्डे : सकाळ वृत्तसेवा

नाशिक/गणूर : नुकताच पोलीस उपनिरीक्षक पदासाठी २०१८ मध्ये झालेल्या परीक्षांचा निकाल जाहीर झाला. यात चांदवड येथील अभिजित अहिरे हा अनुसूचित जाती प्रवर्गातून राज्यात पहिला आल्याने चांदवड सारख्या ग्रामीण भागातील मुलांसाठी तो आदर्श ठरत आहे. स्पर्धा परीक्षांचा काळ म्हणजे स्मार्टफोन पूर्ण बाजूला ठेवावा लागतो, दिवसरात्र फक्त अभ्यास आणि अभ्यासच करायचा या गोष्टीला छेद देत दिवसाला सरासरी सात तास अभ्यास करून पहिल्याच प्रयत्नांत अभिजित अहिरे याने पोलीस उपनिरीक्षक पदाला गवसणी घातलीय. 

"स्मार्टफोन दुधारी तलवार;त्याचा योग्य वापर व्हावा!"

गृहिणी असलेल्या भाग्यश्री आणि सेवानिवृत्त मुख्याध्यापक किशोर अहिरे यांचा अभिजित मोठा मुलगा. प्राथमिक, माध्यमिक शिक्षण चांदवड तर यांत्रिकी शिक्षण नाशिकमध्ये केले. वडील मुख्याध्यापक असले तरी त्यांचा तिथपर्यंत असलेला खडतर प्रवासच माझ्यासाठी प्रेरणा असल्याचं अभिजित सांगतो. शिवाय सेवानिवृत्त होईपर्यंत अनेक अधिकारी, डॉक्टर्स वडिलांनी घडवले हे सांगताना वडिलांच्या चेहऱ्यावरचा अभिमान बघून आपणही शासकीय सेवेत अधिकारी झालो तर वडिलांना किती आनंद होईल याच आशावादातून अभिजित स्पर्धा परीक्षांकडे वळाला. पुण्यात वर्षभर क्लास केला यानंतर घरीच अभ्यास सुरू केला आणि पहिल्याच प्रयत्नात त्याने पोलीस उपनिरीक्षक पदाला त्याने गवसणी घातली. यशाचं सर्व श्रेय वडिलांना देणाऱ्या अभिजित च्या वडिलांनी कष्टाचं चीज झाल्याचं सांगत अश्रूंना वाट मोकळी करून दिली.

अभ्यास जितका वेळ कराल तितका प्रामाणिकपणे करा,

दिवसरात्र अभ्यास आणि अभ्यास करण्यापेक्षा जितका वेळ कराल तितका प्रामाणिकपणे करा, शिवाय स्मार्टफोन चा स्मार्ट स्टडी साठी वापर करण्याचा सल्लाही तो देतो मात्र हे सांगताना स्मार्टफोन हे दुधारी शस्र असल्याची जाणीवही तो करून देतो. हा प्रवास इथे थांबवणार नसून राज्यसेवा परीक्षेतून उपजिल्हाधिकारी पदाला गवसणी घालण्याचं स्वप्न असल्याचं तो सांगतो.अभिजित पीएसआय झाल्याची बातमी कळताच चांदवड मधील मित्रांनी गुलालाची उधळण, फटाक्यांची आतिषबाजी करत आनंदोत्सव साजरा केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

BJP Solapur: पक्षशिस्तीचा भाजपचा दणका! प्रशिक्षण शिबिराला गैरहजर २९ नगरसेवकांना नोटिसा; मंगळवारपर्यंत खुलासा मागवला

जरांगेंनी तिसऱ्यांदा मागितली परवानगी, फक्त ५० जण, वेळ पाळणार आणि शांततेत आंदोलन; मुंबई पोलिसांना दिलं हमीपत्र

Maratha Reservation: मनोज जरांगेंच्या सुरक्षेत वाढ; अंतरवाली सराटी ते मुंबई प्रवासात विशेष सुरक्षा पथक तैनात

Latest Marathi News Update : दिशा सालियन मृत्यू प्रकरणात CBIचा FIR; ठाकरे पिता-पुत्रांसह रिया चक्रवर्ती, डिनो मोरिया यांच्या चौकशीची मागणी

Rishi Panchami 2026: ऋषिपंचमीला नांगर न लागलेल्या रानभाज्यांचा नैवेद्य का दाखवला जातो? जाणून घ्या धार्मिक अन् वैज्ञानिक कारण!

SCROLL FOR NEXT