नाशिक

कोल्हापूर फाटा–अभोणा रस्त्याची चाळण जीवघेण्या खड्ड्यांतून नागरिकांची कसरत; प्रशासनाच्या निषेधार्थ ग्रामस्थ लोकवर्गणीतून करणार रस्ता दुरुस्ती

CD
फोटो ओळी- 09639 अभोणा रस्त्याची झालेली दुरव्यवस्था. कोल्हापूर फाटा-अभोणा रस्त्याची चाळण जीवघेण्या खड्ड्यांतून रोजची कसरत; ग्रामस्थ करणार लोकवर्गणीतून दुरुस्ती कळवण, ता. २ : तालुक्यातील कोल्हापूर फाटा ते अभोणा रस्त्याची अक्षरशः चाळण झाली आहे. रस्त्यावर जागोजागी खड्डे पडल्याने वाहनचालकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. वारंवार मागणी करूनही संबंधित विभागाने दुरुस्तीकडे दुर्लक्ष केल्यामुळे संतप्त ग्रामस्थांनी आता लोकवर्गणी गोळा करून स्वतःच रस्ता दुरुस्त करण्याचा निर्णय घेतला आहे. कोल्हापूर फाटा-अभोणा मार्गावर नेहमी वर्दळ असते. मात्र, या मार्गाची चाळण झाल्याने खड्डे चुकविताना वाहनचालकांना कसरत करावी लागते. रात्री खड्ड्यांचा अंदाज येत नसल्याने अपघाताचा धोका वाढत आहे. अभोणा येथे कांदा मार्केट असल्याने शेतकऱ्यांना रस्त्याच्या दुरवस्थेमुळे शेतमाल बाजारपेठेत घेऊन जाणे कठीण होते. रुग्णवाहिका व अन्य वाहनांनाही या मार्गावरून जाताना अडथळ्यांची शर्यत पार करावी लागते. विद्यार्थ्यांसह ज्येष्ठ नागरिकांनाही याचा त्रास होत आहे. रस्त्याच्या दुरुस्तीसाठी संबंधित विभाग आणि लोकप्रतिनिधींकडे अनेकदा मागणी करूनही आश्वासनांपलीकडे ठोस कार्यवाही होत नसल्याचा आरोप आहे. खड्डे दिवसेंदिवस वाढत असून प्रशासनाचे दुर्लक्ष कायम आहे. ............... चौकट : प्रशासनाच्या कारभाराला लोकवर्गणीचा आरसा रस्ते दुरुस्त करणे ही संबंधित विभागाची जबाबदारी असताना ग्रामस्थांवर लोकवर्गणी गोळा करण्याची वेळ आली आहे. खड्ड्यांमुळे एखादा अपघात किंवा जीवितहानी झाल्यास त्याची जबाबदारी कोण घेणार, असा प्रश्न नागरिकांनी केला आहे. प्रशासनाने तात्पुरती मलमपट्टी न करता या मार्गाची कायमस्वरूपी दुरुस्ती करावी, अशी मागणी होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अपघातात ३ सख्ख्या भावांचा मृत्यू, नव्या बुलेटवरून जाताना अज्ञात वाहनाची धडक; तिघांचंही वय १२ ते १६

IND vs WI, 3rd ODI: अंशुल कंबोजचं भारतासाठी पदार्पण, सिराजलाही संधी; पण दोघांना वगळलं; पाहा Playing XI

इन्स्टावर मुलीचे २ लाख फॉलोअर्स, मुलासाठी आलेलं स्थळ पालकांनी नाकारलं

ओये बिर्याणी एक और कॅच छोड़ ना!’ भारतीय फॅन्सनी सैम अयूबची घेतली फिरकी; आधी वैभवला OUT करून पाळणा हलवला, नंतर दोन कॅच सोडले VIDEO व्हायरल

Latest Marathi News Live Update : कराडला तीन एकरातील ऊसाला आग, ऐन दुष्काळात शेतकऱ्याला फटका

SCROLL FOR NEXT