police arrested criminal1.jpg 
नाशिक

''कसा आला तावडीत, आता तर आम्ही तुला सोडतच नसतो!''...चार वर्षांनी भेटला 'तो'

सकाळवृत्तसेवा

नाशिक : (जुने नाशिक) मारहाण प्रकरणातील चार वर्षांपासून फरारी संशयितास भद्रकाली पोलिसांनी पोलिस आयुक्तालयातून रविवारी (ता. 23) ताब्यात घेतले. पोलिस आयुक्तालयातून अशा प्रकारे संशयितास ताब्यात घेतल्याची कारवाई पोलिसांमध्ये चर्चेचा विषय ठरली. 


असा आहे प्रकार

पाथर्डी गाव परिसरातील मोठा राजवाडा येथील संशयित दिलीप उद्धव प्रधान याचा 2016 मध्ये तक्रारदाराशी वाद झाला होता. त्याने तक्रारदारास जबर मारहाण केली. त्यात तक्रारदाराचे दोन दात पडून गंभीर जखमी झाले होते. भद्रकाली पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला होता. संशयित फरारी होता. न्यायालयात प्रकरण आल्यावर न्यायालयाने संशयिताविरुद्ध अटक वॉरंट काढले. पोलिस रविवारी (ता. 23) संशयिताच्या शोधात त्याच्या पाथर्डी गाव येथील घरी गेले. इंदिरानगर पोलिसांनी त्यास ताब्यात घेतल्याची माहिती मिळाली. इंदिरानगर पोलिस ठाणे गाठत संशयितास ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला. पोलिस आयुक्तालयात विविध पोलिस ठाण्यातील सराईत संशयितांची ओळख परेड (आदान-प्रदान) साठी संशयित दिलीप यास घेऊन गेल्याचे समजले. 

त्यानंतर श्री. मोरे आणि श्री. बाराईत यांनी पोलिस आयुक्तालयात धडक दिली. त्या ठिकाणी पोलिस आयुक्‍तांसह वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत आदान-प्रदान सुरू होते. त्यांनी संशयितास सर्वांच्या समोर ताब्यात घेतले. या प्रकारामुळे पोलिस कर्मचाऱ्यांत चांगलीच चर्चा रंगली. संशयितास न्यायालयात हजर केले असता, त्याची मध्यवर्ती कारागृहात रवानगी करण्यात आली.  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tata Sonsने चंद्रशेखरन यांना निवडलं, पण टाटा ट्रस्ट्सचा विरोध! नोएल टाटाच खरे किंगमेकर? टाटामध्ये चेअरमनची निवड कशी होते?

Jos Buttler: जॉस बटलरचा वर्ल्ड रेकॉर्ड! ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये १५,००० धावा करणारा फलंदाज; विराट कोहली, रोहित शर्मा टॉप ५ मध्येही नाहीत

आम्ही कुठे जायचं? न्यायाधीशाचा प्रश्न; ५ महिन्यात २३ जणांना फाशीची शिक्षा, आता ९७ गंभीर खटले ट्रान्सफर होताच संतापले

गर्दीतून जात होती सलमान खानची कार, ड्रायव्हरच्या चूकीमुळे भाईजान चिडला, चालकाला जोरात मारलं अन्... Viral Video

Insulin Resistance Symptoms: डायबेटीस होण्याआधी शरीर देतं ‘हे’ संकेत; असं ओळखा तुम्हाला इन्सुलिन रेझिस्टन्स आहे की नाही!

SCROLL FOR NEXT