Removed AC and old chairs in Kalidas Kalamandir ticket booking office. esakal
नाशिक

Kalidas Kala Mandir : कालिदास कलामंदिराचा एसी गेला कुठे? महापालिका चौकशी करणार का?

सकाळ वृत्तसेवा

Kalidas Kala Mandir : सांस्कृतिक चळवळींचे प्रमुख केंद्र असलेल्या महाकवी कालिदास कलामंदिरातील एसी बंद पडल्याच्या कारणास्तव व्यवस्थापकास तडकाफडकी निलंबित केल्यानंतर आता दुसऱ्या एसीची चोरी झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

बुकिंग कार्यालयातील एसी व्यवस्थापकांच्या सांगण्यावरून काढून घेण्यात आला. परंतु, हा एसी दुसरीकडे बसवण्याऐवजी परस्पर पोबारा केल्याचे समजते. हा एसी नेमका गेला कुठे, याची चौकशी महापालिका करणार का, असाही प्रश्न नाट्य रसिकांनी उपस्थित केला आहे. (AC of Kalidas Kala Mandir gone Will municipality investigate nashik news)

कालिदास कलामंदिरातील एसी भर नाटकात बंद पडल्यामुळे प्रेक्षकांसह कलावंतांनी तीव्र नाराजी व्यक्त केली होती. हा एसी महापालिकेने तत्काळ सुरू केला. इतकेच नव्हे तर कालिदासचे व्यवस्थापक जगन्नाथ कहाणे यांना निलंबितही केले.

निलंबनानंतर आता हळूहळू कारनामे बाहेर येऊ लागले आहेत. स्मार्टसिटीने कालिदासचे काम केल्यानंतर बुकिंग कार्यालयात एसी बसवला होता. हा एसी काही दिवस सुरू राहिला. पण एक दिवस अचानक येथील कर्मचारी बाळासाहेब गिते यांनी हा एसी काढून घेतला.

त्याचे कारणमीमांसा सांगत बसण्यापेक्षा साहेबांचा आदेश असल्याचे म्हटले. त्यामुळे कुणाच्या सांगण्यावरून हा एसी काढला गेला, याविषयी नाट्यसंस्था चालकांना काहीच कळाले नाही. हा एसी इतर ठिकाणी बसवण्याचे प्रयोजन असेल म्हणून त्यांनी गीतेंच्या कृतीकडे दुर्लक्ष केले.

पण बराच दिवसांनंतर त्यांच्या लक्षात आले, की कालिदासमध्ये इतर कुठेही हा एसी बसवलेला नाही तर त्याची परस्पर विल्हेवाट लावण्यात आली आहे. त्यामुळे या एसीची महापालिका आता चौकशी करणार का, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

सुविधांचा वाणवा

कालिदासमधील कॅन्टीन कोरोनानंतर बंदच आहे. त्यामुळे येथे येणाऱ्या नाट्य रसिकांना खाद्यपदार्थ घेण्यासाठी बाहेर जावे लागते. काही प्रेक्षक पाण्याची बॉटलही घेतात. त्यांनाही पाणी मिळत नाही.

तसेच बुकिंग कार्यालयातील खुर्च्याही बदलण्यात आलेल्या आहेत. येथे प्लॅस्टीकच्या खुर्च्या टाकलेल्या दिसतात. मग स्मार्ट सिटीने घेतलेल्या आरामदायी खुर्च्या गेल्या कुठे, असा प्रश्न निर्माण होतो.

"उन्हामुळे अंगाची काहिली होत असताना कार्यालयात बसवलेला एसी अचानकपणे काढून घेण्यात आला. काढलेला एसीही कालिदासमध्ये दिसत नाही. बुकिंगच्या माध्यमातून महापालिकेला थेट उत्पन्न मिळवून देतो. पण आमच्या ऐवजी महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना एसीची हवा मिळते, असा दुजाभाव का?" - राजेंद्र जाधव,

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पाकिस्तान पुन्हा बनतोय 'दहशतवादाचा कारखाना'; जैश-लष्करचे तब्बल 300 नवे अड्डे उभारण्याची तयारी, कोण देतंय इतका पैसा?

Ganpati Bappa 2025: गणपती बाप्पाला दुर्वा का अर्पण करतात? जाणून घ्या कारण आणि महत्त्व

Supreme Court: प्रीमियम व्हिस्की खरेदी करणारे ग्राहक सुशिक्षित अन् जागरूक, सुप्रीम कोर्टाने असं का म्हटलं? प्रकरण काय?

Latest Marathi News Updates : नाशिकच्या कपालेश्वर मंदिरात पुन्हा दोन गटात वाद

कोकणच्या लाल मातीत कोरला दशावतार, संपूर्ण महाराष्ट्रात चित्रपटाची जोरदार चर्चा!

SCROLL FOR NEXT