नाशिक

Breaking News : पंचवटीत अपघात; सेवानिवृत्त पोलिस कर्मचाऱ्याचा मृत्यू

पंचवटीतील क्रांतीनगर येथे अपघात झाला आहे.

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : मखमलाबाद रोडवरील पीरबाबा दर्गा समोर एका खाजगी बसच्या दुचाकीचा अपघात झाला. या अपघातात दुचाकी चालक सेवानिवृत्त पोलिस कर्मचाऱ्याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.

दिलीप विक्रमसिंग वळवी (वय, ५९) असे अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या सेवानिवृत्त पोलिस कर्मचाऱ्याचे नाव आहे. दिलीप वळवी हे मखमलाबाद रोडवरुन आपल्या दुचाकीने घराकडे परतत होते. यावेळी त्यांना एका खाजगी बसचा (क्रमांक एम.एच. ४३ एच. ३५५७) ओव्हरटेक करताना दुचाकीच्या आरश्याला धक्का लागला आणि वळवींचा तोल गेल्याने ते काही अंतर रस्त्यावर घसरत गेले. त्यामुळे त्यांच्या डोक्याला गंभीर मार लागला असून त्यांचा जागेवरच मृत्यू झाला. मयत दिलीप वळवी हे काही महिन्यांपूर्वीच सरकारवाडा पोलिस ठाण्यात सहायक पोलिस उपनिरीक्षक पदी असताना सेवानिवृत झाले. त्यांचे पश्चात पत्नी,एक मुलगा, दोन मुली व सून असा परिवार असल्याचे समजते.

या भागात नाही गतिरोधक

मखमलाबाद रोडवर नेहमी वर्दळ असते. काही दिवसांपूर्वीच सदर रोडचे कॉंक्रिटीकरण करण्यात आले आहे. येथे वाहने मार्गक्रमण करत असताना वेग मर्यादा नसते. उदय कॉलनी, क्रांती नगर, भरगच्च वस्ती असलेला भाग आहे. या भागात गतिरोधक देखील नाही. यासाठी सामजिक कार्यकर्ते अॅड सुरेश आव्हाड यांनी वेळोवेळी गतिरोधकासाठी मागणी केली होती. जर या ठिकाणी गतिरोधक असते तर कदाचित प्राण वाचले असते अशी चर्चा बघ्यांमध्ये सुरू होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India Squad for WI Series: हार्दिक पांड्या संघाबाहेरच, जसप्रीत बुमराहचेही नाव गायब; ऋतुराज गायकवाडची वापसी, तर एक सप्राईज पॅकेज, जाणून घ्या भन्नाट टीम इंडिया

India Squad for WI Series: रोहित शर्माच्या भविष्याचा फैसला झाला... वेस्ट इंडिजविरुद्ध BCCI ची वन डे, ट्वेंटी-२० संघाची घोषणा

Manoj Jarange Patil: मोठी बातमी! हैदराबाद गॅझेटियरमध्ये नावंसुद्धा सापडली; विखे पाटलांसह शिष्टमंडळ हैदराबादला जाणार?

Vidyadhar Anaskar : राज्य सहकारी बँकेचे ५,७४५ कोटींचे विक्रमी नेटवर्थ; ठेवी कमी करण्याचा निर्णय व्यावसायिक गणितातून

Marathi News Live Updates : मध्य प्रदेशातील सांवर येथे भिंत कोसळून चार महिलांचा मृत्यू, पाच जण जखमी

SCROLL FOR NEXT